Kojagiri Purnima : कोजागरी पौर्णिमेला काय करावे आणि काय करू नये, जाणून घ्या पूजेचे नियम
मराठी बातम्या  /  धर्म  /  Kojagiri Purnima : कोजागरी पौर्णिमेला काय करावे आणि काय करू नये, जाणून घ्या पूजेचे नियम

Kojagiri Purnima : कोजागरी पौर्णिमेला काय करावे आणि काय करू नये, जाणून घ्या पूजेचे नियम

Published Oct 15, 2024 11:23 AM IST

Sharad Purnima 2024 Do and Don't : हिंदू धर्मात शरद पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. जाणून घ्या या दिवशी काय करावे आणि काय करू नये-

कोजागिरी पौर्णिमा
कोजागिरी पौर्णिमा

Sharad Purnima : दरवर्षी आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षात शरद पौर्णिमेचा सण साजरा केला जातो. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे. शरद पौर्णिमेची रात्र खूप खास मानली जाते. असे मानले जाते की या दिवशी चंद्र त्याच्या १६ कलांनी भरलेला असतो. ज्योतिष शास्त्रानुसार शरद पौर्णिमेचे व्रत केल्याने सुख-संपत्ती प्राप्त होते. शरद पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमाही म्हणतात. या दिवशी कोजागरी पूजाही केली जाते.

शरद पौर्णिमा २०२४ कधी आहे - 

हिंदू कॅलेंडरनुसार, आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची पौर्णिमा १६ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजून ४१ मिनिटांनी सुरू होईल आणि १७ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजून ५३ मिनिटांनी समाप्त होईल. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी शरद पौर्णिमा हा सण साजरा केला जाणार आहे.

शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्रोदयाची वेळ - 

शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्रोदयाची वेळ संध्याकाळी ५ वाजून ४ मिनिटे आहे. या दिवशी चंद्राच्या किरणांमुळे अमृतवृष्टी होते आणि चंद्रप्रकाशात खीर ठेवल्याने ती अमृतसारखी होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

शरद पौर्णिमेच्या दिवशी काय करावे?

शरद पौर्णिमेच्या दिवशी खीर चंद्रप्रकाशात ठेवली जाते. चंद्राच्या किरणांमुळे खीरमध्ये अमृत प्रकट होते, असे मानले जाते. चांदण्या रात्री खीर ठेवणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

शरद पौर्णिमेच्या दिवशी हनुमानासमोर चार मुखी दिवा लावावा. असे केल्याने बजरंगबली प्रसन्न होतो असे मानले जाते.

शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करावी. असे केल्याने जीवनात सुख-संपत्ती येते, असे मानले जाते.

या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूच्या मंत्रांचा जप करावा.

शरद पौर्णिमेच्या दिवशी गरीब किंवा गरजूंना दान करावे.

शरद पौर्णिमेच्या दिवशी काय करू नये-

शरद पौर्णिमेच्या दिवशी नकारात्मक विचार मनात आणू नयेत.

या दिवशी वादविवाद टाळावेत.

शरद पौर्णिमेच्या दिवशी रागावर नियंत्रण ठेवावे.

या दिवशी खोटे बोलू नये.

शरद पौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे तामसिक अन्न खाऊ नये.

या दिवशी काळा रंग वापरू नये.

शरद पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही पैशाचे व्यवहार करू नयेत. या दिवशी कोणत्याही व्यक्तीला कर्ज दिल्यास लक्ष्मीचा कोप होतो. 

शरद पौर्णिमेच्या दिवशी सवाश्न महिला घरी आल्यास तिला रिकाम्या हाताने परत जाऊ देवू नये. शक्य झाल्यास त्यांची ओटी भरावी.

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner