
Sharad Purnima Upay : महाराष्ट्रात कोजागिरी नावानं प्रसिद्ध असलेली अश्विन महिन्यातील शरद पौर्णिमा आज, २८ ऑक्टोबर रोजी आहे. आजच्या रात्री चंद्र १६ कलांनी परिपूर्ण असेल. या रात्री चंद्रदेवाची पूजा केल्यानं शुभ फळ मिळतं, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
यंदा शरद पौर्णिमेला चंद्रग्रहण होणार आहे. हे वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण असून ते भारतातही दिसणार आहे. त्यामुळं सुतक लागू असेल. हा सूतक कालावधी २९ ऑक्टोबर रोजी ग्रहणाच्या ९ तास आधी सुरू होईल. अशा वेळी शरद पौर्णिमेला चंद्रदेवाची पूजा आणि विशेष उपाय चंद्रग्रहणाच्या आधी किंवा सूतक काळानंतरच करता येतात.
यंदाही शरद पौर्णिमेला बुधादित्य योग, गजकेसरी योग, शश योग आणि सिद्धी योग हे चार शुभ योग जुळून येत आहेत. या शुभ योगाच्या काळात विशेष उपाय केल्यास आर्थिक अडचणी दूर होतात, असं म्हटलं जातं. शरद पौर्णिमेला लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी काही खास करता येतात.
कोजागिरी तथा शरद पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी मातेची मनोभावे पूजा करा आणि तिच्या बीज मंत्रांचा जप करा. असं केल्यानं लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि तिला धन, समृद्धी आणि सुख प्राप्त होते, असं मानलं जातं.
शरद पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी मातेला खिरीचा नैवेद्य दाखवावा. सूतक सुरू होण्यापूर्वी या खिरीमध्ये तुळशीची पानं पसरून टाकावी. चंद्रग्रहणानंतर हा प्रसाद कुटुंबातील सर्वांना वाटावा आणि स्वत: देखील सेवन करावा.
शरद पौर्णिमेच्या निमित्तानं गायीची सेवा करा. आपल्या घरच्या गायीला गूळ आणि भाकरी खाऊ घाला. असं केल्यामुळं घरात शांतता राहते. घरची गरिबी दूर होऊन आपली भरभराट होते, असं म्हणतात.
शरद पौर्णिमेला लक्ष्मीची पूजा करताना महालक्ष्मी अष्टक किंवा श्रीसूक्ताचं पठण करा. हे पठण केल्यामुळं लक्ष्मीचा कृपाआशीर्वाद भक्तावर राहतो. भक्ताला सुख-समृद्धी आणि धनाचा लाभ होतो.
खाऊची पान लक्ष्मीला खूप प्रिय असतात. त्यामुळं पूजा करताना ही पानं देवीला अर्पण करा. असं केल्यामुळं लक्ष्मीची कृपा वर्षभर भक्तांवर राहते, असं म्हणतात. पूजेसाठी ठेवलेली सुपारी नंतर घरातील सदस्यांमध्ये वाटून घ्यावी.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे, असा हिंदुस्तान टाइम्स मराठीचा दावा नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या
