Kitchen Vastu Tips : स्वयंपाकघरात या गोष्टींचं पालन करणं लाभदायक, सुख-समृद्धीसाठी घरात काय कराल?-kitchen vastu shastra tips and remedies in marathi see details ,धर्म बातम्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  Kitchen Vastu Tips : स्वयंपाकघरात या गोष्टींचं पालन करणं लाभदायक, सुख-समृद्धीसाठी घरात काय कराल?

Kitchen Vastu Tips : स्वयंपाकघरात या गोष्टींचं पालन करणं लाभदायक, सुख-समृद्धीसाठी घरात काय कराल?

Aug 24, 2023 10:32 AM IST

Kitchen Vastu Tips : अनेक लोक घरातील स्वयंपाकघराची वेगवेगळ्या प्रकारे रचना करत असतात. परंतु जेवण बनवताना काही गोष्टींचं पालन करणं अत्यंत फायदेशीर मानलं जातं.

kitchen vastu shastra marathi
kitchen vastu shastra marathi (HT)

kitchen vastu shastra marathi : व्यक्तीच्या सुख आणि समृद्धीसाठी घराची रचना योग्य असणं आवश्यक असतं. वास्तुतील दोष दूर करणं अतिशय गरजेचं असतं. स्वयंपाकघरात जेवण तयार करताना आणि जेवताना काही गोष्टींची अतिशय काळजी घ्यावी लागते. नाही तर स्वयंपाकघरात तुमचा दिवस वाया जाऊ शकतो. तसेच जेवण करताना व्यक्तीने काही विशिष्ट नियमांचं पालन करायला हवं. त्यामुळं व्यक्तीच्या आयुष्यात सकारात्मक बदल होण्यास मदत होते. तसेच आयुष्यात येणारी संकटं दूर होतात. त्यामुळं स्वयंपाकघरात जेवण तयार करताना आणि जेवताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी, याबाबत जाणून घेऊयात.

स्वयंपाकघरात कोणत्या गोष्टींची काळजी घ्याल?

तुमच्या घरात पायऱ्यांच्या खाली कधीही स्वयंपाकघर असायला नको. कारण त्यामुळं तुमच्या आयुष्यात आर्थिक संकटं निर्माण होण्याची शक्यता असते. कर्जामुळं तुमचं आयुष्य उध्वस्त होण्याची शक्यता असते. त्यामुळं घरातील पायऱ्यांच्या खाली स्वयंपाकघर बांधणं टाळायला हवं. याशिवाय शौचालयाच्या वर किंवा खाली स्वयंपाकघराची रचना करू नये. त्यामुळं तुमच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. याशिवाय कुटुंबातील लोकांची कमाई कमी होऊ शकते. त्यामुळं शौचालय हे स्वयंपाकघरापासून नेहमी दूर बांधायला हवं.

स्वयंपाकघरात जेवण तयार करत असताना तुमचं तोंड दक्षिण दिशेला असायला हवं. उत्तर आणि पश्चिम दिशेला तोंड करून जेवण तयार करणं आणि जेवणं तुमच्या आरोग्यावर बेतू शकतं. कारण त्यामुळं तुम्हाला सतत वेगवेगळे आजार होण्याचा धोका असतो. कुटुंबात नेहमीच आर्थिक चणचण निर्माण होण्यास सुरुवात होते.

घरात नकारात्मक शक्तींचा प्रभाव वाढण्यास सुरुवात होते. याशिवाय स्वयंपाकघरात जेवण करत असताना व्यक्तीने नेहमीच पूर्वेकडे तोंड करून जेवायला हवं. त्यामुळं मानसिक तणाव दूर होण्यास मदत होते. तसेच कोणतेही घातक आजार होण्यापासून व्यक्तीचा बचाव होतो. घराच्या मुख्य दरवाजा समोर चूल असू नये. त्यामुळं तुमचं कुटूंब आर्थिक अडचणीत सापडण्याची शक्यता असते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner