Kharmas 2024 Date : यंदा खरमास कधी? 'या' दिवसापासून महिनाभर थांबतील सर्व शुभ कार्य
मराठी बातम्या  /  धर्म  /  Kharmas 2024 Date : यंदा खरमास कधी? 'या' दिवसापासून महिनाभर थांबतील सर्व शुभ कार्य

Kharmas 2024 Date : यंदा खरमास कधी? 'या' दिवसापासून महिनाभर थांबतील सर्व शुभ कार्य

Mar 13, 2024 12:56 PM IST

Kharmas in march 2024 : ज्योतिषांच्या मते, जेव्हा सूर्य देव धनु आणि मीन राशीत प्रवेश करतो तेव्हा खरमास सुरू होतो. खरमासमध्ये शुभ कार्य करू नयेत, अशी मान्यता आहे.

Kharmas 2024 Date : यंदा खरमास कधी? 'या' दिवसापासून महिनाभर थांबतील सर्व शुभ कार्य
Kharmas 2024 Date : यंदा खरमास कधी? 'या' दिवसापासून महिनाभर थांबतील सर्व शुभ कार्य

एका वर्षात दोन वेळा खरमासचा महिना येतो. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, खरमास दरम्यान विवाह, मुंडन, गृहप्रवेश करणे यांसारखे शुभ कार्य केले जात नाही. कारण खरमासचा महिना अशुभ मानला जातो. 

खरमास ही सनातन धर्मातील ज्योतिषशास्त्रीय घटना आहे. ज्योतिषांच्या मते, जेव्हा सूर्य धनु आणि मीन राशीत प्रवेश करतो तेव्हा खरमास सुरू होतो. धनु आणि मीन राशीचा स्वामी बृहस्पति आहे. खरमास वर्षातून दोनदा सुरू होतो. खरमासात शुभ कार्य करू नये, अशी धार्मिक धारणा आहे. मार्च २०२४ मध्ये खरमास कधी सुरू होईल आणि या कालावधीत कोणती कामे टाळावीत ते जाणून घेऊया.

खरमास कधी सुरू होणार?

यंदा १४ मार्च रोजी सूर्य कुंभ राशीतून निघून १२:३६ वाजता मीन राशीत प्रवेश करेल. यानंतर खरमास सुरू होईल. यानंतर १३ एप्रिलला सूर्य मीन राशीतून बाहेर पडून मेष राशीत प्रवेश करेल. सूर्यदेवाच्या मेष राशीत प्रवेशाने खरमास कालावधी संपेल.

खरमासात ही कामे करून नये

खरमास कालावधी हा शुभ काळ मानला जात नाही. यामुळेच खरमास काळात कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे.

खरमासात लग्न न करण्याचा सल्ला दिला जातो.

खरमासच्या काळात कोणतीही मालमत्ता खरेदी करू नये, घर खरेदी करू नये किंवा नवीन व्यवसाय सुरू करू नये.

खरमास काळात गृहप्रवेश करू नये.

या महिन्यात लोकांनी नवीन वाहन खरेदी करू नये.

खरमास दरम्यान तामसिक अन्न सेवन करू नये.

खरमासात सूर्यदेवाची पूजा करताना सूर्यदेवाच्या मंत्रांचा जप करावा.

खरमासमध्ये समस्या आल्यास हे उपाय करा

खरमासमध्ये तुम्हाला काही समस्या आल्यास तुम्ही हे उपाय करू शकता. रोज सकाळी सूर्याला हळद मिसळलेले पाणी अर्पण करावे. "ओम नमो भगवते वासुदेवाय" चा जप करा. यावेळी, आपल्या आहारात विशेष शुद्धता ठेवा. धार्मिक स्थळांना नियमित भेट द्या आणि प्रार्थना करा. जास्त सोने घालणे टाळा.

Whats_app_banner