एका वर्षात दोन वेळा खरमासचा महिना येतो. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, खरमास दरम्यान विवाह, मुंडन, गृहप्रवेश करणे यांसारखे शुभ कार्य केले जात नाही. कारण खरमासचा महिना अशुभ मानला जातो.
यंदा १४ मार्चपासून खरमास सुरू झाला आहे. यामुळे आता शुभ कार्यांसाठी महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे.
खरमास ही सनातन धर्मातील ज्योतिषशास्त्रीय घटना आहे. ज्योतिषांच्या मते, जेव्हा सूर्य धनु आणि मीन राशीत प्रवेश करतो तेव्हा खरमास सुरू होतो. १४ मार्चला सूर्याने कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश केला, यानंतर खरमासला सुरूवात झाली आहे.आता १३ एप्रिलपर्यंत सूर्य मीन राशीत राहील. यानंतर खरमास संपेल. अशा स्थितीत १३ एप्रिलनंतरच शुभ कार्ये करता येणार आहेत.
एप्रिल - १८ ते २६ एप्रिल आणि २८ एफ्रिल या तारखा लग्नासाठी शुभ आहेत.
जुलै - ९ ते १७ जुलै दरम्यान लग्नासाठी शुभ मुहूर्त आहेत.
नोव्हेंबर - १७, १८, २२ ते २६ नोव्हेंबर हे लग्नासाठी शुभ दिवस आहेत.
डिसेंबर - २, ३, ४, ५, ९, १९, ११, १३, १५ लग्नासाठी शुभ दिवस राहतील.
धार्मिक दृष्टीकोनातून खरमास हा शुभ काळ मानला जात नाही, त्यामुळे या काळात शुभ कार्य करणे देखील निषिद्ध आहे. यावेळी खरमास जवळपास ३० दिवस चालणार आहे. या कालावधीत घरात शुभ कार्य करणे, नवीन वाहन खरेदी, जमीन खरेदी, विवाह, मुंज, अन्नप्राशन सोहळा, नवीन कार्याचा शुभारंभ आदी कामे करू नयेत. असे मानले जाते की खरमासात केलेले शुभ कार्य व्यक्तीला अशुभ फळ देते. अशा स्थितीत अशुभ परिणाम टाळण्यासाठी या काळात कोणतेही शुभ कार्य करणे टाळावे.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)