Kharmas 2024 Date In Marathi : वर्ष २०२४ मध्ये लग्न आणि इतर शुभ कार्यांसाठी लोकांना काही काळ वाट पाहावी लागणार आहे. कारण, खरमास १६ डिसेंबर २०२४ पासून सुरू होत आहे. या काळात कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य निषिद्ध मानले जाते. खरमास १६ जानेवारी २०२४ रोजी संपणार आहे. यानंतर विवाह आणि इतर शुभ कार्यांची प्रक्रिया सुरू होईल.
हिंदू धर्मात खरमास अशुभ मानला जातो. या महिन्यात सूर्यदेव धनु राशीत प्रवेश करतात. यालाच धनुर्मासही म्हणतात. या काळात विवाह, गृहप्रवेश, मुंडन, नामकरण समारंभ आदी शुभ कार्ये थांबतात. त्यामुळे कोणतेही शुभ कार्य आयोजित केले जात नाही अशी मान्यता आहे.
२०२४ मध्ये लग्नासाठी शुभ मुहूर्त : डिसेंबरमध्ये २, ३, ४, ५, ९, १०, ११, १४ आणि १५ डिसेंबर हा विवाहासाठी शुभ मुहूर्त आहे. त्यामुळे २०२४ मध्ये लग्नाचे अवघे ९ मुहूर्त शिल्लक आहेत. त्यानंतर धनु राशीत सूर्याच्या प्रवेशाने खरमास सुरू होईल.
१६ जानेवारीला खरमास समाप्ती : खरमास संपताच १६ जानेवारी २०२५ पासून लग्नाचा शुभ मुहूर्त सुरू होईल. ज्योतिषीय गणनेनुसार, या महिन्यात लग्नासाठी एकूण १२ शुभ मुहूर्त उपलब्ध असतील. वर्ष २०२५ मध्ये सर्वाधिक मुहूर्त जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च मध्ये आहेत. यंदा लग्नाचा मुहूर्त १५ डिसेंबरपर्यंत राहणार असून त्यानंतर खरमासनंतर २०२५ मध्ये १६ जानेवारीपासून शुभ मुहूर्त सुरू होईल, १६ ते २३, २७, २८ जानेवारी दरम्यान लग्नाचा मुहूर्त असेल. १, २, ३, ६, ८, १२ ते २४ फेब्रुवारी दरम्यान सलग विवाह मुहूर्त आहेत. मार्च मध्ये १, २, ३, ६, ७, १२, १३, १४ या शुभ मुहूर्तसाठी तारखा असतील. खरमासच्या या महिन्यात लग्नासारख्या शुभ कामांवर बंदी असली तरी यावेळी लोक तयारीत गुंततात. बाजारात कपडे, दागिने आणि सजावटीच्या वस्तूंची खरेदी सुरू होते. जानेवारी आणि फेब्रुवारीच्या शुभ मुहूर्तासाठी लग्नस्थळे आणि इतर सेवांचे बुकिंगही सध्या वेगाने होत आहे.
खरमास दरम्यान पूजा-पाठ करणे अत्यंत शुभ मानले जाते. यावेळी नकारात्मक ऊर्जा अधिक सक्रिय असते आणि ती शांत करण्यासाठी पूजा आणि विशेष विधी आवश्यक असतात. या काळात तुळशीपूजा सर्वात महत्त्वाची मानली जाते. धार्मिक ग्रंथानुसार तुळशीला पवित्रतेचे प्रतीक मानले जाते. तुळशीची नियमित पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि कुटुंबातील सर्व संकटे दूर होतात.
संबंधित बातम्या