हिंदू धर्मात प्रत्येक सण-उत्सव, व्रत-वैकल्याला धार्मिक महत्व आहे. आज २० ऑक्टोबर २०२४ रोजी करवा चौथ व्रत पाळले जात आहे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी रविवारी निर्जळी उपवास करण्यात येणार आहे. या दिवशी महिला दिवसभर पाण्याचा एक थेंबही पीत नाहीत. दरवर्षी हा उत्सव कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला साजरा केला जातो.
करवा चौथला काही ठिकाणी 'करक चतुर्थी' असेही म्हटले जाते. हिंदीमध्ये 'करवा' किंवा 'करक' म्हणजे 'एक भांडे' तर 'चौथ' म्हणजे 'चौथा दिवस'. कार्तिक महिन्यात पौर्णिमेनंतर चौथ्या दिवशी चंद्राला जल अर्पण करण्यासाठी मातीचे भांडे वापरले जाते. करवा ज्याला 'अर्घ' देखील म्हणतात ते अतिशय शुभ मानले जाते आणि पूजेनंतर कुटुंबातील पात्र स्त्रीला किंवा ब्राह्मणांना 'दान' म्हणून दिले जाते.
चंद्र दर्शनानंतर चाळणीवर दिवा लावून चंद्र बघतात नंतर पतीला बघतात. सून उपवास ठेवते तेव्हा उपवासाच्या आधी सासूने सर्गी देण्याची परंपरा आहे. जाणून घेऊया करवा चौथ पूजेची योग्य पद्धत आणि शुभ मुहूर्त-
ब्रह्म मुहूर्तावर सकाळी उठून स्नान वगैरे करून सूर्योदयापूर्वी सरगीचे सेवन करावे. देवी-देवतांना वंदन करावे आणि व्रताचा संकल्प घ्यावा. संध्याकाळची पूजा विशेषतः करवा चौथच्या वेळी केली जाते. संध्याकाळपूर्वी पूजास्थळी गेरूचा फलक लावावा. नंतर तांदळाच्या पिठाने पाटावर करव्याचे चित्र बनवावे. त्याऐवजी तुम्ही फोटो देखील वापरू शकता.
संध्याकाळच्या शुभ मुहूर्तावर फलकाच्या जागी चौरंग ठेवावा. आता पार्वतीच्या मांडीवर बसलेले भगवान शिव आणि गणेशाचे चित्र चौरंगावर ठेवावे. देवी पार्वतीला सौभाग्याचे साहित्य अर्पण करावे आणि मातीचे भांडे पाण्याने भरून पूजेच्या ठिकाणी ठेवा. आता भगवान श्री गणेश, माता गौरी, भगवान शिव आणि चंद्र देवाचे ध्यान करून करवा चौथ व्रताची कथा ऐका. चंद्राची पूजा करून त्याला जल अर्पण करा. मग चाळणीच्या मागून चंद्राकडे पाहा आणि मग आपल्या पतीचा चेहरा पाहा. यानंतर पती पत्नीला पाणी देऊन उपवास सोडतो. घरातील सर्व मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका. तसेच शेवटी क्षमा प्रार्थना करा.
आज करवा चौथचा सर्वोत्तम काळ शुभ आणि अमृत चौघडिया वेळ संध्याकाळी ६ ते रात्री ८ आहे. त्याच वेळी, संध्याकाळी ७.५६ नंतर चंद्रोदय होण्याची शक्यता आहे, त्यानंतर महिला चंद्राचे दर्शन करून आणि चंद्राला अर्घ्य देऊन उपवास सोडू शकतात.
टीप : ही माहिती केवळ श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.