Karwa Chauth 2024: कार्तिक महिन्यात करवा चौथचे पर्व येते. यावेळी हे पर्व आज, म्हणजेत २० ऑक्टोबर रोजी साजरे केले जात आहे. हे व्रत केल्यामुळे महिलेच्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त होते, अशी धार्मिक मान्यता आहे. या बरोबरच पती-पत्नीच्या नात्यात गोडवा तयार होतो. या पार्श्वभूमीवर या पर्वाशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया.
Karwa Chauth 2024: हिंदू धर्मात कार्तिक महिन्याचे विशेष असे महत्व सांगितले जाते. या महिन्यात अनेक महत्त्वाचे सण साजरे केले जातात. यांमध्ये करवा चौथचे पर्वही येते. हा सण दरवर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला साजरा केला जातो. या शुभदिनी विवाहित महिला अखंड सौभाग्याच्या प्राप्तीसाठी निर्जल उपवास धरतात. हे व्रत विधिपूर्वक केल्यास पतीला दीर्घयुषी होण्याचे वरदान प्राप्त होते अशी मान्यता आहे. तर, हे व्रत केल्याने अविवाहित तरुणींचे लवकरच विवाह जुळतात अशीही मान्यता आहे. तुम्हाला माहीत आहे का, की हे व्रत सर्वप्रथम कोणी केले होते? पाहू या याबाबतची माहिती...
अशी झाली करवा चौथ व्रताची सुरुवात
पौराणिक कथेनुसार, एकदा देव आणि दानवांमध्ये युद्ध झाले. हे युद्ध संहारक होते. या युद्धात देवांनी आपल्याकडे असलेल्या शक्तींचा उपयोग केला. मात्र त्यांना यश मिळू शकले नाही. देवांना राक्षस जुमानत नव्हते. अशा स्थितीत ब्रह्मदेवाने सर्व देवतांना कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला व्रत करायला सांगितले. हेच व्रत पुढे करवा चौथ या नावाने प्रसिद्ध झाले.
या व्रताबाबत ब्रह्मदेवाने म्हटले की, देवतांनी हे व्रत केल्यास त्यांच्या पतींना दानवांविरुद्धच्या युद्धात जय मिळेल. यानंतर सर्व देवतांनी आपल्या पतींसाठी करवा चौथचे व्रत केले. या व्रताच्या प्रभावामुळे सर्व देवतांनी युद्धात विजय प्राप्त केला. तेव्हापासूनच करवा चौथच्या व्रताची सुरुवात झाली.
पौराणिक कथेनुसार, एकदा एका पर्वतावर अर्जुन निलगिरी तपस्येत लीन होता. तेव्हा पांडवांवर अनेक प्रकारची संकटे येऊ लागली. अशात द्रौपदीने श्रीकृष्णाकडे मदत मागितली. त्यावर श्रीकृष्णाने म्हटले की, कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला करवा मातेचे व्रत करावे. श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून द्रौपदीने विधिपूर्वक व्रत केले. या व्रताच्या प्रभावामुळे पांडवाना संकटांपासून मुक्ती मिळाली.
करवा चौथ व्रताची वेळ : सकाळी ६ वाजून ३४ मिनिटांपासून ते संध्याकाळी ७ वाजून २२ मिनिटांपर्यंत
करवा चौथ पूजा मुहूर्त: संध्याकाळी ५ वाजून ४७ मिनिटांपासून ते ७ वाजून ४ मिनिटांपर्यंत
करवा चौथच्या दिनी चंद्रोदयाची वेळ: संध्याकाळी ७ वाजून २२ मिनिटांपर्यंत
संबंधित बातम्या