Karva Chauth Wishes : तू भेटलास आणि जीवनाला आकार आला! खास अंदाजात द्या ‘करवा चौथ’च्या शुभेच्छा
मराठी बातम्या  /  धर्म  /  Karva Chauth Wishes : तू भेटलास आणि जीवनाला आकार आला! खास अंदाजात द्या ‘करवा चौथ’च्या शुभेच्छा

Karva Chauth Wishes : तू भेटलास आणि जीवनाला आकार आला! खास अंदाजात द्या ‘करवा चौथ’च्या शुभेच्छा

Published Oct 19, 2024 12:19 PM IST

Karva Chauth Wishes In Marathi:करवा चौथच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी निर्जळी उपवास करतात आणि नंतर चंद्राला अर्घ्य देऊन आपला उपवाससोडतात. या करवा चौथ निमित्ताने तुम्ही तुमच्या जोडीदाराला,मित्र मैत्रिणींना खास शुभेच्छा देऊ शकता.

Karwa Chauth 2024
Karwa Chauth 2024

Karva Chauth Wishes In Marathi : भारतातील अनेक भागांमध्ये सौभाग्यवती स्त्रिया ‘करवा चौथ’चे व्रत करतात. यावर्षी करवा चौथचे व्रत रविवारी, २० ऑक्टोबर २०२२ रोजी ठेवण्यात येणार आहे. लग्न झालेल्या महिला सध्या या व्रताच्या तयारीत व्यस्त झाल्या आहेत. करवा चौथच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी निर्जळी उपवास करतात आणि नंतर चंद्राला अर्घ्य देऊन आपला उपवास सोडतात. या करवा चौथनिमित्ताने तुम्ही तुमच्या जोडीदाराला, मित्र मैत्रिणींना खास शुभेच्छा देऊ शकता. ‘या’ मेसेजेसच्या माध्यमातून तुम्ही या शुभेच्छा देऊ शकता.

 

करवा चौथच्या निमित्ताने सुख तुमच्या दारी येवो, 

प्रेम आणि आनंदाने तुमच्ये आयुष्य फुलून जावो, 

करवा चौथच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा!

 

 

प्रत्येक स्त्रीच्या डोक्यावर सिंदूर शोभून दिसतो, 

त्याच्या असण्याने स्त्रीत्वाचा कायम आदर असतो, 

तुमच्या जोडीदाराला लाभावे निरोगी आयुष्य, 

तुम्ही कायम सुखी, समाधानी असावे हीच इच्छा, 

करवा चौथच्या तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला हार्दिक शुभेच्छा!

 

 

आज आहे करवा चौथ, सण हा प्रेमाचा, 

पतिच्या दिर्घायुष्याची प्रार्थना करण्याचा, 

पत्नीचे आयुष्यातील तिचे महत्त्व सांगण्याचा, 

पत्नीवरील प्रेम व्यक्त खऱ्या अर्थाने व्यक्त करण्याचा, 

करवा चौथच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

 

 

आजचा दिवस तुमच्यासाठी, 

घरी या लवकर माझ्यासाठी, 

आतुरतेने वाट पाहते तुमची, 

सफल होवो करवा चौथची पूजा माझी, 

करवा चौथच्या हार्दिक शुभेच्छा!

 

तू भेटलास आणि जीवनाला आकार आला, 

तू आयुष्यात आल्याने काळोखाचा प्रकाश झाला, 

तुझ्या येण्याने उजळून निघाले माझे संपूर्ण आयुष्य, 

तू आणि तूच आहे आता माझ्या जगण्याचे उद्दीष्ट!

करवा चौथच्या खूप खूप शुभेच्छा!

 

 

चंद्र दर्शनाने तुमचे हृदय भरून जावो, 

तुमच्यावर कायम प्रेमाचा वर्षाव होवो, 

हीच देवाकडे माझी प्रार्थना, 

तुम्हाला करवा चौथच्या हार्दिक शुभेच्छा!

 

 

करवा चौथच्या या पवित्र दिवशी, 

तुमचे तुमच्या पतीसोबतचे प्रेम आणि बंध, 

प्रत्येक जाणाऱ्या दिवसाबरोबर अधिक दृढ होत जावो. 

करवा चौथच्या शुभेच्छा!

 

 

करवा चौथचा हा दिवस शुभ ठरो, 

तुमच्या लग्नाचे बंधन नेहमीपेक्षा अधिक मजबूत होवो!

करवा चौथच्या शुभेच्छा

 

 

करवा चौथ ही केवळ एक जुनी परंपरा नाही,

तर एका प्रेमळ पत्नीची तिच्या पतीवरची श्रद्धा, 

प्रेम आणि काळजी याचे उदाहरण आहे.

करवा चौथच्या शुभेच्छा

Whats_app_banner