Pandharpur Kartiki yatra: पंढरपूर येथे २३ नोव्हेंबर पासून कार्तिकी यात्रा सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक महत्वाचे निर्णय देवस्थान कमीटीने घेतले आहे. येथील व्हीआयपी आणि ऑनलाइन दर्शन सेवा बंद करण्यात आली असून विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन आता भाविकांना २४ तास घेता येणार आहे. तसेच मंदिरातील देवाचे नित्योपचार देखील बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महारज औसेकर यांनी माहिती दिली.
महत्वाची असलेल्या कार्तिकी यात्रेला येत्या २३ नोव्हेंबर पासून सूरवत होत आहे. ही यात्रा वारकरी संप्रदायात महत्वाची समजली जाते. दरम्यान, आषाढ ते कार्तिक या चार महिन्यांच्या कालावधीत अनेक महाराज आणि भाविक पंढरपुरात मुक्काला अससात. या चातुर्मासाची समाप्ती कार्तिकी होत असून राज्यभरतून या यात्रेसाठी भाविक येत असतात. या भाविकांची येणारी संख्या लक्षात घेता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे दर्शन २४ तास उपलब्ध ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
यंदाच्या कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूर सज्ज झाले आहे. या यात्रेचे चोख नियोजन करण्यात आले आहे. भाविकांची गैरसोय टाळावी या साठी विविध सुविधा मंदिर व्यवस्थापन आणि प्रशासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत. दर्शन रांगेतील भाविकांसाठी इतर सुविधांसह विश्रांती कक्ष देखील उभारण्यात येणार आहे. तर चंद्रभागा नदीच्या तीरावर ६५ एकर जमिनीवर भाविकांच्या राहण्यासाठी देखील तयारी करण्यात अलायी आहे.
दारमायन, या यात्रेसाठी मोठ्या संख्येने भाविक येणार आहेत. सध्या चंद्रभागा नदीला फारसे पाणी नसल्याने उजणी धरणातून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.