Kartiki Ekadashi Wishes : सावळे सुंदर रूप मनोहर...कार्तिकी एकादशीनिमित्त प्रियजणांना द्या हटके शुभेच्छा
मराठी बातम्या  /  धर्म  /  Kartiki Ekadashi Wishes : सावळे सुंदर रूप मनोहर...कार्तिकी एकादशीनिमित्त प्रियजणांना द्या हटके शुभेच्छा

Kartiki Ekadashi Wishes : सावळे सुंदर रूप मनोहर...कार्तिकी एकादशीनिमित्त प्रियजणांना द्या हटके शुभेच्छा

Nov 11, 2024 09:23 AM IST

Kartiki Ekadashi Wishes In Marathi : दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवउठनी एकादशी साजरी केली जाते. पंढरपूरची यात्रा, चातुर्मास समाप्ती आणि तुळशी विवाह या दिवसाचे खास वैशिष्ट्य आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त या खास दिवसाच्या प्रियजणांना द्या हटके शुभेच्छा.

कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा
कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा

वर्षात दोन मोठ्या एकादशी येतात. यातील पहिली आषाढी एकादशी आणि दुसरी म्हणजे कार्तिकी एकादशी. कार्तिकी एकादशीला चातुर्मास समाप्त होतो आणि त्यामुळे ही एकादशी मोठी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते. मंगळवार १२ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे. या दिवशी वारकरी संप्रदायातील तसेच वैष्णव पंथीय एक दिवसाचे उपवासाचे व्रत करतात. कार्तिक शुद्ध एकादशीलाचं प्रबोधिनी एकादशी, देवउठनी एकादशी किंवा बोधिनी एकादशी असेही म्हणतात. 

दिवाळी झाली की विठू भक्तांची कार्तिकी एकादशीसाठी लगबग सुरू होते. यादिवशी तुळशी विवाह देखील साजरा होतो. तसेच यादिवशी काही शहरात श्रीरामाचा रथ काढण्याची परंपरा आहे. कार्तिकी एकादशी निमित्त आपल्या प्रियजणांना द्या मनापासून शुभेच्छा.

महाराष्ट्राचं दैवत असलेल्या विठूरायाची आणि रूक्मिणी मातेची खास पूजा केली जाते. एकादशीचं व्रत सांभाळत विठू भक्त विठ्ठल-रूक्मिणीचं दर्शन घेतात. कार्तिकी एकादशी निमित्त राज्यातील विठ्ठल-रूक्मिणीची मंदिरं गर्दीने फुलून गेलेली असतात. वारकरी मंडळी पायी वारी करत, दिंड्या, पालख्या घेऊन पंढरपूरात दाखल होतो. या निमित्ताने अखंड हरिनाम सुरू असतो. गाव खेड्यात विठ्ठल नामस्मरणात तल्लीन होत अभंग, भजनं गायली जातात.

कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा

सावळे सुंदर रूप मनोहर ।

राहो निरंतर हृदयी माझे ।।

कार्तिकी एकादशीच्या भक्तीमय शुभेच्छा!

...

पुढे परतूनी येऊ, आता निरोप असावा

जनी विठ्ठल दिसावा,मनी विठ्ठल रूजावा

डोळे मिटता सामोरे,पंढरपूर हे साक्षात

मन तृप्तीत भिजून, पाही संतांचे मंदिर

प्रबोधिनी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

...

देवउठनी एकादशीला उठता भगवान विष्णू

संपतो चातुर्मास अन् वाजतो सनई चौघडा

तुळशी झाली वधू शालीग्राम स्वरूप वर

पाहता मंगल होई त्रिभुवन"

कार्तिकी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा

...

ताल वाजे, मृदूंग वाजे, वाजे हरीचा वीणा !!

माउली निघाले पंढरपूर, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला !!

!! जय जय राम कृष्ण हरी !!

कार्तिकी एकादशी च्या खूप खूप शुभेच्छा!

...

जातां पंढीरीसी सुख वाटे जीवा

आनंदे केशवा भेटतांचि

या सुखा उपमा नाही त्रिभुवनी

पहिली शोधोनी अवघी तीर्थे

कार्तिकी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा!

...

भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची

उभी पंढरी आज नादावली

तुझे रूप ओठी तुझे रूप ध्यानी

जीवाला तुझी आस का लागली

देवउठनी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी|

कर कटावरी ठेवोनियां||

कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा!

Whats_app_banner