Kartik Purnima : कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेला काय करावे आणि काय करू नये जाणून घ्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  Kartik Purnima : कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेला काय करावे आणि काय करू नये जाणून घ्या

Kartik Purnima : कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेला काय करावे आणि काय करू नये जाणून घ्या

Nov 12, 2024 07:20 PM IST

Kartik Purnima 2024 Do and Dont : यावर्षी कार्तिक पौर्णिमा १५ नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काही गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचं मानलं जातं. या दिवशी काही कामे निषिद्ध असतात. जाणून घेऊया कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये?

कार्तिक पौर्णिमेला काय करावे आणि काय करू नये
कार्तिक पौर्णिमेला काय करावे आणि काय करू नये

कार्तिक पौर्णिमेचा दिवस स्नानकार्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. असे मानले जाते की या दिवशी गंगा नदीत स्नान केल्याने मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो आणि अनंत फळ मिळते. या दिवशी देव दीपावली देखील साजरी केली जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार कार्तिक पौर्णिमा शुक्रवार १५ नोव्हेंबरला आहे. एकादशीपासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो.

धार्मिक मान्यतेनुसार कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध केला आणि देवांना त्याच्या अत्याचारांपासून मुक्त केले. या आनंदात देवांनी दीप प्रज्वलित केले. यामुळे या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात. यादिवशी शिव मंदिरात त्रिपुर वात लावली जाते. या दिवशी घरात, घराबाहेर व देवळातही दिव्याची आरास करून पूजा केली जाते तसेच नदीत दीपदान करून लोक आनंदोत्सव साजरा करतात. 

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी-नारायण आणि महादेवाच्या पूजेबरोबरच काही खास गोष्टींची काळजी घेणे महत्वाचे मानले जाते. जाणून घेऊया कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये?

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काय करावे?

कार्तिक पौर्णिमेनिमित्त सकाळी लवकर उठून पवित्र नदीत स्नान करावे.

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करा.

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी नदीत दीपदान करा. शक्य नसल्यास मंदिरात दीपदान करावे.

या दिवशी विष्णू सहस्रनामाचे पठण करता येते.

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पाण्यात कच्चे दूध मिसळून चंद्रदेवाला अर्घ्य देणे शुभ मानले जाते.

या दिवशी गायीचे दान करणे देखील पुण्यदायी मानले जाते.

या शुभ दिवशी तुम्ही अन्न, गूळ आणि कपडे दान करू शकता.

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काय करू नये?

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी चांदीची भांडी किंवा दूध दान करू नये.

या शुभ दिवशी घरात अंधार ठेवू नये.

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तामसिक अन्न ग्रहण करण्यास मनाई आहे.

या महान सणाला ज्येष्ठांचा अपमान करणे टाळावे किंवा अपशब्द वापरू नयेत.

या दिवशी गरीब, असहाय आणि गरजूंना रिकाम्या हाताने परत पाठवू नये. आपल्या क्षमतेनुसार अन्नदान आणि धान्यदान करणे शुभ आहे.

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner