प्रत्येक महिन्यात पौर्णिमा आणि अमावस्या येते. दरवर्षी १२ पौर्णिमा असतात. कार्तिक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला कार्तिक किंवा त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात, यंदा कार्तिक पौर्णिमा १५ नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. त्रिपुरासुराच्या वधानंतर या दिवशी जगातील सर्व देवतांनी दिवे लावून दिवाळी साजरी केली, म्हणूनच याला देव दिवाळी असेही म्हणतात. कार्तिक पौर्णिमेची तारीख दैवी कृपा आणि उर्जेने परिपूर्ण आहे. त्यामुळे या दिवशी केलेले स्नान आणि दान यांचे विशेष महत्त्व आहे.
कार्तिक पौर्णिमा तिथी या वर्षी १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजून २० मिनिटे ते १६ नोव्हेंबर पहाटे २ वाजून ५९ मिनिटापर्यंत असेल. अशा स्थितीत कार्तिक पौर्णिमेचे व्रत उदया तिथीनुसार १५ नोव्हेंबरला पाळले जाणार आहे. कार्तिक पौर्णिमा आणि देव दिवाळी निमित्त प्रियजणांना शुभेच्छा देण्यासाठी काही हटके संदेश, वाचा आणि पाठवा.
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही दिशा
घेऊन येवो नवी उमेद नवी आशा,
तुम्हाला व तुमच्या परिवाराला
देव दिवाळी आणि कार्तिक पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
...
नदीच्या तिरी असंख्य दिव्यांची आरास
त्रिपुरारी ठरो सर्वांसाठी खास
कार्तिक पौर्णिमा आणि देव दिवाळीच्या
हार्दिक हार्दिक शुभेच्छा !
...
कार्तिक पौर्णिमेच्या आनंदोत्सवानिमित्त
तुम्हाला उत्तम आरोग्य, संपत्ती, शांती
आणि समृद्धी लाभो हीच सदिच्छा
कार्तिक पौर्णिमा आणि देव दिवाळीच्या
मनपूर्वक शुभेच्छा
...
शंकरपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा देव दिवाळीला,
उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्ष उल्हासाला,
वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला,
कार्तिक पौर्णिमा आणि देव दिवाळीच्या
खूप खूप शुभेच्छा
...
स्नेहाचा सुगंध दरवळला, देव दिवाळीचा सण आला,
एकच मागणे या कार्तिक पौर्णिमेला, सौख्य समृद्धी लाभो सर्वांना
त्रिपुरारी पौर्णिमा आणि देव दिवाळीच्या शुभेच्छा!
...
वर्षामागून वर्ष जाती,
बेत मनीचे तसेच राहती
पण तुझी साथ कधी न सुटती,
हीच इच्छा कायमस्वरूपी मनी
कार्तिक पौर्णिमा आणि देव दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
…
कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात
सौख्य, मांगल्य, समृद्धी आणि
दीर्घायुष्य घेऊन येणारी ठरो…
हिच आमची मनोकामना…
त्रिपुरारी पौर्णिमा आणि देव दिवाळीच्या
खूप खूप शुभेच्छा
…
चांदण्यात न्हावून निघाली चांदरात,
पौर्णिमेच्या चंद्राचा पसरला रुपेरी प्रकाश…
देव दिवाळीची दिव्यांची आरास
नदीकाठी सजला लख्ख लख्ख प्रकाश…
कार्तिक पौर्णिमा आणि देव दिवाळीच्या
मनपूर्वक शुभेच्छा
…