Kartik Purnima Upay 2024: प्रत्येक महिन्यात दोन एकादशी आणि एक पौर्णिमा आहे. पण कार्तिक महिन्यातील एकादशी आणि पौर्णिमा तिथीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कार्तिक महिन्यात देवउठनी एकादशी साजरी केली जाते. भगवान विष्णू चार महिन्यांनंतर योगनिद्रातून जागे होतात. त्यामुळे हा महिना भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहे. यावर्षी कार्तिक पौर्णिमा १५ नोव्हेंबर २०२४ रोजी आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवसाचा लाभ घेण्यासाठी शास्त्रांमध्ये काही उपाय सांगितले आहेत. असे मानले जाते की या दिवशी काही उपाय केल्याने सुख-संपत्तीबरोबरच मान-सन्मानातही वाढ होते. जाणून घ्या, कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कोणते उपाय करावेत…
हिंदू धर्मात तुळशीच्या झाडाला पूजनीय आणि अत्यंत पवित्र मानले जाते. तुळशीच्या झाडाची नियमित पूजा करावी असे सांगितले गेले आहे. परंतु कार्तिक पौर्णिमेला तुळशीपूजन अत्यंत लाभदायक मानले जाते. कार्तिक पौर्णिमेला तुळशीला जल अर्पण करा आणि संध्याकाळी तुळशीवर तुपाचा दिवा लावणे अत्यंत शुभ आणि लाभदायक असते. असे मानले जाते की नियमितपणे तुळशीला जल अर्पण केल्याने आणि दिवे लावल्याने जीवनात सुख-समृद्धी येते.
कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी विष्णू सहस्रनाम आणि लक्ष्मी स्तोत्राचे पठण करावे. त्यानंतर सायंकाळी दीपदान करावे. विष्णू सहस्त्रनाम, लक्ष्मी स्तोत्राचे पठण आणि दीपदान केल्याने जीवनात आर्थिक समृद्धी येते, असे मानले जाते. यासोबतच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील मिळतो.
कार्तिक पौर्णिमेला सूर्यदेवाला जल अर्पण करावे. असे मानले जाते की सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने जल अर्पण करणाराला सौभाग्य प्राप्त होते. त्याचबरोबर जल अर्पण करणाऱ्या व्यक्तीच्या कुंडलीतील सूर्याची स्थिती मजबूत असते.
कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दीपदान करणे अत्यंत शुभ मानले जाते. तुम्हाला हवं असेल तर नदी किंवा तलावात तुम्ही दीपदान दान करू शकता. जर का तुम्हाला हे करणे शक्य नसेल तर आपण तुळशीसमोर दिवा लावू शकता. असे मानले जाते की दीपदान केल्याने शनी, राहू, केतू आणि यम यांचे होणारे अशुभ प्रभाव कमी होतात.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.