Kartik Purnima : कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा कशी साजरी करावी? जाणून घ्या स्नान-दानाची वेळ आणि महत्व
मराठी बातम्या  /  धर्म  /  Kartik Purnima : कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा कशी साजरी करावी? जाणून घ्या स्नान-दानाची वेळ आणि महत्व

Kartik Purnima : कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा कशी साजरी करावी? जाणून घ्या स्नान-दानाची वेळ आणि महत्व

Nov 13, 2024 03:27 PM IST

Kartik Purnima Snan Daan Time In Marathi : कार्तिक पौर्णिमेचा सण कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जाणून घ्या कार्तिक पौर्णिमेला स्नान-दानाची शुभ वेळ, पूजा पद्धत आणि महत्त्व.

कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा २०२४ स्नान-दानाची वेळ
कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा २०२४ स्नान-दानाची वेळ

हिंदू धर्मात पौर्णिमा तिथीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कार्तिक महिन्यात येणारी पौर्णिमा अत्यंत पवित्र आणि खास मानली जाते. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देव दीपावली देखील साजरी केली जाते. 

देव दिवाळी हा देवांच्या दिवाळीचा उत्सव म्हणून ओळखला जातो. असे मानले जाते की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्रिपुरासुराचा अंत झाल्याच्या आनंदात देवांनी संपूर्ण स्वर्ग दिव्यांनी उजळून टाकला, त्याला दीपावलीचे स्वरूप देण्यात आले. म्हणून कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात.

कार्तिक पौर्णिमा व्रत २०२४ : पौर्णिमा तिथी १५ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ६ वाजून १९ मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी १६ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री २ वाजून २८ मिनिटांपर्यंत चालेल. कार्तिक पौर्णिमेचे व्रत १५ नोव्हेंबर २०२४, शुक्रवार रोजी केले जाईल.

कार्तिक पौर्णिमा स्नानाची वेळ - कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी स्नानाचा शुभ मुहूर्त पहाटे ०४.५८ ते ०५.५१ वाजेपर्यंत असेल. या दिवशी सत्यनारायण पूजेचा मुहूर्त सकाळी ६.४४ ते १०.४५ वाजेपर्यंत असेल. चंद्रोदयाची वेळ दुपारी ०४ वाजून ५१ मिनिटांची आहे.

देव दिवाळीचा शुभ मुहूर्त - देव दिवाळीच्या दिवशी प्रदोष काळ सायंकाळी ०५.१० ते ०७.४७ या वेळेत असेल.

कार्तिक पौर्णिमा पूजन

ब्रह्म मुहूर्त- सकाळी ०४.५७ ते ०५:५०

अभिजीत मुहूर्त - सकाळी ११:४३ ते दुपारी १२:२६

विजय मुहूर्त - दुपारी ०१:५२ ते दुपारी ०२:३५

गोधूली मुहूर्त - सायंकाळी ०५:२६ ते ०५:५३

सायान्ह संध्या- सायंकाळी ०५:२६ ते ०६:४६

अमृत काळ- ०५:३६ ते ०६:४६ 

कार्तिक पौर्णिमेचे महत्त्व 

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीपूजन अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त रात्री ११.३९ ते १२.३३ वाजेपर्यंत असेल.

कार्तिक पौर्णिमा राहूकाळ आणि भद्रा वेळ- कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भद्राची सावली असते. ज्योतिषशास्त्रात भद्रा आणि राहू काळ पूजा आणि शुभ कार्यासाठी चांगले मानले जात नाहीत. त्यामुळे भद्रा आणि राहूकाळात शुभ कार्यांना बंदी आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी राहूकाळ सकाळी १० वाजून ४४ मिनिटांपासून दुपारी १२ वाजून ५ मिनिटांपर्यंत राहील. भद्रा सकाळी ६ वाजून ४३ मिनिटांपासून दुपारी ४ वाजून ३७ मिनिटांपर्यंत राहील.

कार्तिक पौर्णिमेला कार्तिक स्नान संपते- अनेक भाविक कार्तिक स्नान करतात. म्हणजेच ब्रह्म मुहूर्तात दररोज सूर्योदयापूर्वी पवित्र नदीत स्नान करतात. जर नदीत आंघोळ करणे शक्य नसेल तर तुम्ही घरीही करू शकता. कार्तिक स्नान शरद पौर्णिमेपासून सुरू होते आणि कार्तिक पौर्णिमेला संपते.

कार्तिक पौर्णिमेचे महत्त्व - कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दीपदानाचे विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की या दिवशी देवी लक्ष्मीची विधिवत पूजा केल्याने अमोघ पुण्य प्राप्त होते. या दिवशी तुळशीची पूजा केल्यास शुभ फळ मिळते असे मानले जाते.

कार्तिक पौर्णिमा उपाय- कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी चंद्राला अर्घ्य द्यावे. धनाची देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी मुख्य दरवाजावर दिवा लावावा. या दिवशी पवित्र नदीत स्नान करून दीपदान केल्यास आर्थिक समृद्धी येते, असे मानले जाते.

टीप : ही माहिती केवळ श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Whats_app_banner