Kartik Purnima 2024: नोव्हेंबरमध्ये कार्तिक पौर्णिमा किंवा देव दिवाळी कधी आहे? जाणून घ्या तारीख, स्नान, दानाचे महत्त्व
मराठी बातम्या  /  धर्म  /  Kartik Purnima 2024: नोव्हेंबरमध्ये कार्तिक पौर्णिमा किंवा देव दिवाळी कधी आहे? जाणून घ्या तारीख, स्नान, दानाचे महत्त्व

Kartik Purnima 2024: नोव्हेंबरमध्ये कार्तिक पौर्णिमा किंवा देव दिवाळी कधी आहे? जाणून घ्या तारीख, स्नान, दानाचे महत्त्व

Nov 06, 2024 12:01 PM IST

Kartik Purnima 2024 : हिंदू धर्मात पौर्णिमा तिथीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी स्नान आणि दान केल्याने मोठे पुण्य प्राप्त होते, असे मानले जाते. जाणून घ्या, नोव्हेंबरमध्ये कार्तिक पौर्णिमा कधी आहे?

नोव्हेंबरमध्ये कार्तिक पौर्णिमा किंवा देव दिवाळी कधी आहे? जाणून घ्या तारीख, स्नान, दानाचे महत्त्व
नोव्हेंबरमध्ये कार्तिक पौर्णिमा किंवा देव दिवाळी कधी आहे? जाणून घ्या तारीख, स्नान, दानाचे महत्त्व

Kartik Purnima 2024 Date: प्रत्येक महिन्यात अमावस्या आणि पौर्णिमा तिथी येत असते. हिंदू दिनदर्शिकेनुसार पौर्णिमा शुक्ल पक्षात येते. हिंदू धर्मात पौर्णिमा तिथीला अनन्यसाधारण महत्त्व आहे, परंतु कार्तिक महिन्याची पौर्णिमा अत्यंत शुभ आणि लाभदायक मानली जाते. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी स्नान आणि दीपदान केल्याने अनेक पटीने अधिक शुभ फळ मिळते, असे मानले जाते. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देव दिपावली किंवा देव दिवाळी साजरी केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. म्हणून देव दिवाळीला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी स्नान केल्याने जीवनात आनंद, सुख, शांती आणि समृद्धी येते, असे म्हटले जाते. जाणून घ्या यावर्षी कार्तिक पौर्णिमा कधी आहे, कोणते आहेत शुभ मुहूर्त आणि देव दिवाळीचे महत्त्व काय आहे ते...

कधी आहे कार्तिक पौर्णिमा?

पौर्णिमा शुक्रवारी, १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ०६ वाजून १० मिनिटांनी सुरू होईल आणि १६ नोव्हेंबर रोजी रात्री ०२ वाजून ५८ मिनिटांनी संपेल. कार्तिक पौर्णिमा शुक्रवारी, १५ नोव्हेंबर २०२४ रोजी साजरी केली जाईल.

देव दिवाळी प्रदोष काल मुहूर्त

देव दिवाळीचा प्रदोष काल मुहूर्त १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ०५ वाजून १० मिनिटांपासून ते ०७ वाजून ४७ मिनिटे या वेळेत असेल. पूजेचा एकूण कालावधी ०२ तास ३७ मिनिटे इतका आहे.

कार्तिक पौर्णिमेला चोघडिया मुहूर्त-

चर- सर्वसाधारण : सकाळी ०६:४३ ते ०८:०४

लाभ - उन्नती : सकाळी ०८:०४ ते ०९:२४

अमृत - सर्वोत्कृष्ट: सकाळी ०९:२४ ते १०:४४

शुभ - सर्वोत्तम: दुपारी १२:०५ ते दुपारी ०१:२५

लाभ - उन्नती: सकाळी ०८:४६ ते रात्री १०: २५ पर्यंत

कार्तिक पौर्णिमेला स्नान-दानाचे शुभ मुहूर्त

ब्रह्म मुहूर्त- पहाटे ०४:७५ ते पहाटे ०५:५० पर्यंत

प्रात: संध्या- पहाटे ५:२३ पासून ते सकाळी ६:४३ पर्यंत

राहुकाल आणि भद्रा ची वेळ

कार्तिक पौर्णिमा किंवा देव दिवाळीला भद्राचा प्रभाव असणार आहे. ज्योतिषशास्त्रात राहूकाल आणि भद्रा यांना चांगले कार्य करण्यासाठी शुभ मानले जात नाही. भद्रा सकाळी ०६ वाजून ४३ मिनिटांपासून सायंकाळी ०४ वाजून ३७ मिनिटांपर्यंत राहील. राहुकाल सकाळी १० वाजून ४४ मिनिटांपासून दुपारी १२ वाजून ०५ मिनिटांपर्यंत राहील.

कार्तिक पौर्णिमेचे महत्त्व

कार्तिक पौर्णिमेला भगवान शंकराने त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला. याच दिवशी भगवान विष्णूंनी ऋषी-मुनींचे राक्षसांपासून रक्षण करण्यासाठी मत्स्य अवतार धारण केला होता. हा दिवस शीख धर्मासाठी देखील विशेष असा आहे. या दिवशी गुरु नानक जयंती साजरी केली जाते.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Whats_app_banner