Kartik Purnima 2024: कार्तिक पौर्णिमेला जरूर करा हे उपाय, तुम्हाला हवे ते फळ मिळेल!
मराठी बातम्या  /  धर्म  /  Kartik Purnima 2024: कार्तिक पौर्णिमेला जरूर करा हे उपाय, तुम्हाला हवे ते फळ मिळेल!

Kartik Purnima 2024: कार्तिक पौर्णिमेला जरूर करा हे उपाय, तुम्हाला हवे ते फळ मिळेल!

Nov 14, 2024 12:00 PM IST

Kartik Purnima Upay 2024: कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि चंद्रदेव यांची पूजा केली जाते. असे मानले जाते की, या दिवशी काही उपाय केल्याने देवी लक्ष्मीचा घरात कायमस्वरुपी निवास होतो. जाणून घ्या कार्तिक पौर्णिमेचे महत्त्व आणि उपाय.

कार्तिक पौर्णिमेला जरूर करा हे उपाय, तुम्हाला हवे ते फळ मिळेल!
कार्तिक पौर्णिमेला जरूर करा हे उपाय, तुम्हाला हवे ते फळ मिळेल!

Kartik Purnima Upay 2024: कार्तिक पौर्णिमा शुक्रवार, दिनांक १५ नोव्हेंबर २०२४ रोजी आहे. पौराणिक कथांनुसार या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. यामुळे प्रसन्न होऊन देवांनी दीप प्रज्वलित केले होते. तेव्हापासून देव दिवाळी साजरी करण्याची परंपरा आहे. असे म्हटले जाते की देव दिवाळीच्या दिवशी सर्व देवता काशीमध्ये येतात. म्हणून उत्सवाची चमक वाराणसीमध्ये पाहण्यासारखी असते. कार्तिक पौर्णिमेचा दिवस देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो, असे म्हटले जाते. या दिवशी काही उपाय केल्यास इच्छित फळ प्राप्त होते. जाणून घ्या कार्तिक पौर्णिमेला कोणते उपाय करावेत…

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी करावे सत्यनारायण कथेचे पठण!

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण कथेचे पठण करावे. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात, असे मानले जाते.

पिंपळाच्या झाडाला गोड दूध अर्पण करावे!

पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडावर गोड दूध अर्पण करावे. असे केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते, असे मानले जाते.

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीचे पूजन करावे!

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला पिवळ्या रंगाच्या कवड्या अर्पण कराव्यात आणि त्यानंतर त्या आपल्या पैसे ठेवण्याच्या जागी ठेवाव्यात. असे केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात आणि आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत नाही, असे मानले जाते.

शिवमंदिरात महामृत्युंजय संपुत मंत्राचा जप करावा!

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तात गंगेत स्नान केल्यानंतर शिवमंदिरात महामृत्युंजय संपुत मंत्राचा जप करावा. या मंत्राचा जप केल्याने रखडलेल्या कामांमध्ये यश मिळते आणि शत्रूंचा पराभव होऊन मनोकामना पूर्ण होतात, अशी धार्मिक मान्यता आहे.

देवी लक्ष्मी आणि भगवान शाळिग्राम यांची पूजा करावी!

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान शाळिग्रामची पूजा करणे शुभ मानले जाते. असे केल्याने व्यक्तीची इच्छा दूर होते. त्याच प्रमाणे पूजा करणाऱ्या भक्ताच्या जीवनात आशीर्वाद प्राप्त होतो, असे मानले जाते.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Whats_app_banner