Prabodhini Ekadashi : प्रबोधिनी एकादशीला करा या ६ गोष्टी, भगवान विष्णू होतील प्रसन्न
मराठी बातम्या  /  धर्म  /  Prabodhini Ekadashi : प्रबोधिनी एकादशीला करा या ६ गोष्टी, भगवान विष्णू होतील प्रसन्न

Prabodhini Ekadashi : प्रबोधिनी एकादशीला करा या ६ गोष्टी, भगवान विष्णू होतील प्रसन्न

Nov 11, 2024 08:15 PM IST

Prabodhini Ekadashi Upay In Marathi : एकादशी व्रत श्री हरि विष्णूंना समर्पित आहे. मंगळवार १२ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी व्रत आहे. ही एकादशी प्रबोधिनी एकादशी आणि देवउठनी एकादशी नावानेही ओळखली जाते. देवउठनी एकादशीच्या दिवशी काही उपाय केल्याने सुख-समृद्धी वाढते.

प्रबोधिनी एकादशी उपाय
प्रबोधिनी एकादशी उपाय (Shutterstock)

वर्षभरात २४ एकादशी आहेत, ज्या दिवशी भगवान विष्णूची उपासना केली जाते. सर्व एकादशी व्रत भगवान विष्णूला समर्पित आहेत. पण वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशींना वेगवेगळी नावे आणि महत्त्व असते.

देव उठनी एकादशी भगवान श्री हरि विष्णू यांना समर्पित आहे. दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी देव उठनी एकादशी म्हणून साजरी केली जाते. ही एकादशी प्रबोधिनी, देवोत्थानी एकादशी या नावांनीही ओळखली जाते. या दिवशी पूर्ण भक्तीभावाने भगवान विष्णूची पूजा केल्यास पापांपासून मुक्ती मिळू शकते. 

भगवान विष्णू जागे होताच चातुर्मास संपतो आणि चार महिन्यांपासून थांबलेले विवाह, गृहप्रवेश इत्यादी शुभ कार्ये सुरू होतात. भगवान विष्णूच्या शालिग्राम रूपाचा तुळशीशी विवाह होतो. त्यामुळे ही एकादशीही अत्यंत फलदायी मानली जाते. देव उठनी एकादशीच्या दिवशी काही उपाय केल्याने आर्थिक अडचणी दूर होण्याबरोबरच जीवनातील सुख-समृद्धीही वाढते.

देव उठनी एकादशी उपाय

देव उठनी एकादशीच्या दिवशी श्री हरि विष्णूंचा पंचामृताने अभिषेक करावा. असे केल्याने तुमच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या अडचणी दूर होतील आणि तुम्हाला तुमचे कौशल्य दाखविण्याच्या नवीन संधीही मिळतील.

जर तुमच्या वैवाहिक जीवनात वियोगाची परिस्थिती असेल आणि दिवसेंदिवस क्लेश होत असतील तर देव उठनी एकादशीच्या दिवशी माता तुळशीची पूजा करा. या दिवशी लक्ष्मी माता आणि तुळशी मातेला सौभाग्याच्या वस्तू अर्पण करा.

देव उठनी एकादशीला दान करण्याचे विशेष महत्त्व मानले जाते. त्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडचणींवर मात करण्यासाठी देव उठनी एकादशीच्या दिवशी एखाद्या गरीब किंवा गरजू व्यक्तीला अन्न दान करा.

देव उठनी एकादशीला श्रीमद्भागवत कथेचे पठण करणे पुण्यदायी मानले जाते.

जर तुम्ही आर्थिक अडचणींनी त्रस्त असाल तर देव उठनी एकादशीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तात भगवान विष्णूची पूर्ण भक्तीभावाने पूजा करावी आणि एका पानात ॐ विष्णूवे नम: लिहून देवाच्या चरणी अर्पण करावे. दुसऱ्या दिवशी हे पान पिवळ्या कापडात गुंडाळून तिजोरीत ठेवावे.

देव उठनी एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावून प्रदक्षिणा केल्यास भगवान विष्णू तसेच माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. असे केल्याने घरातील दारिद्र्य दूर होऊ शकते.

डिस्क्लेमर: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Whats_app_banner