हिंदू धर्मात कार्तिक महिन्याला विशेष असे महत्त्व आहे. शुक्रवार दिनांक २ नोव्हेबरपासून हा महिना सुरू होत आहे. कार्तिक महिन्यात भगवान विष्णूची उपासना केल्याने सुख आणि संपत्ती टिकून राहते अशी मान्यता आहे. या काळात दान, स्नान, व्रत आणि उपासनेला विशेष महत्त्व आहे. शास्त्रानुसार कार्तिक स्नान केल्याने मागील जन्मांची पापे नष्ट होतात आणि अनंत पुण्य प्राप्त होते. चला जाणून घेऊया कार्तिक महिन्यात काय करावे आणि काय करू नये...
कार्तिक महिन्यात केलेली सूर्यपूजा विशेष फलदायी मानली जाते. दररोज सूर्याला अर्घ्य अर्पण करावे.
कार्तिक महिन्यात दान करणे देखील फायदेशीर आहे.
या महिन्यात दीपदान करण्याचीही विशेष परंपरा आहे. मंदिरांमध्ये आणि नद्यांमध्येही दीपदान केले जाते.
या महिन्यात ब्राह्मणभोजन, गाय दान, तुळशी दान, आवळा दान, अन्नदान याचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे.
तुळशी ही भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहे. तुळशीची पूजा करून भक्त भगवान विष्णूला प्रसन्न करू शकतात. त्यामुळे भाविक विशेषत: तुळशीची पूजा करतात. कार्तिक महिन्यात तुळशीचे रोप दान देखील केले जाते. सकाळ-संध्याकाळ तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावावा.
कार्तिक महिन्यात दान, पूजन आणि स्नानाला खूप महत्त्व आहे. त्याला कार्तिक स्नान असे म्हटले जाते. या महिन्यात सूर्योदयापूर्वी स्नान केले जाते. स्नान करून केलेल्या पूजेला विशेष महत्त्व दिले जाते. याबरोबरच देशातील पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. यावेळी ब्रह्म मुहूर्तावर घरातील महिला नद्यांमध्ये स्नान करतात.
कार्तिक महिन्यात काय करू नये : हिंदू धर्मात या महिन्यात काही गोष्टी टाळण्यास सांगितले आहे. कार्तिक स्नान करणाऱ्या भाविकांनीही याचे पालन केले पाहिजे. मान्यतेनुसार, या महिन्यात धूम्रपान करण्यास मनाई आहे. लसूण, कांदा आणि मांसाहार देखील प्रतिबंधित आहे. या महिन्यात भक्ताने पलंगावर झोपू नये. त्याने जमिनीवर झोपावे. दुपारी झोपणे देखील चांगले मानले जात नाही.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे, असा दावा आम्ही करत नाही. तपशीलवार आणि अधिक माहितीसाठी, कृपया संबंधित विषयातील तज्ञाचा सल्ला घ्या.