Karja Muktiche Upay : कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहात?, मुक्ती हवी आहे?, मग अवश्य करा 'हे' उपाय
Karja Muktiche Upay : कर्जाखाली काही कारणास्तव दबले गेले असाल तर काही उपाय आहेत ज्यांनी आपण कर्जमुक्त होऊ शकता.
ज्योतिष शास्त्रामध्ये सहावं, आठवं, बारावं स्थान आणि मंगळ हे कर्जासाठी जबाबदार ग्रह मानले जातात. जेव्हा मंगळ शक्तीशाली नसतो किंवा अशुभ ग्रहाशी संबंधित असतो, मंगळ आठव्या, बाराव्या किंवा सहाव्या घरात आणि नीच किंवा अस्त स्थितीत असतो, तेव्हा एखादी व्यक्ती नेहमीच ऋणात राहते.
ट्रेंडिंग न्यूज
कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले असल्यास काय कराल?
ज्यांना कर्जाची समस्या आहे त्यांनी हा उपाय पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने करावा. मंगळवारी किंवा मंगळाच्या नक्षत्रात (चित्रा, मृग आणि धनिष्ठा) या नक्षत्रात कधीही कर्ज घेऊ नका. एखाद्यावेळेस तुम्हाला काही कारणास्तव कर्ज घ्यावं लागलंच तर घेतलेल्या कर्जाच्या हफ्त्यांची परतफेड मंगळवारपासूनच करायला सुरु करा. बुद्धी योगात घेतलेले ऋण कधीही संपणार नाही, त्यामुळे बुद्धीयोगात कधीही कर्ज घेऊ नका. एखाद्याने स्थिर लग्न राशीत म्हणजेच (वृषभ, सिंह, वृश्चिक आणि कुंभ) कधीही कर्ज घेऊ नये, अन्यथा कर्जाची परतफेड इच्छा असूनही करणं तुम्हाला शक्य होणार नाही. शक्य असल्यास चार लग्न राशीत (मेष, कर्क, तूळ आणि मकर) कर्ज घ्या.
बुधवारी कोणालाही कर्ज देऊ नका, अन्यथा पैसे बुडू शकतात. शास्त्रात मंगळवार आणि बुधवारी कर्जाचे देण्यास मनाी केली आहे. मंगळवारी कर्ज घेणारा कर्जदार आपल्या आयुष्यात कधीच हे कर्ज चुकवू शकत नाही.
मंगळवारी शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर ''ॐ ऋणमुक्तेश्वर महादेवाय नम:' या मंत्राचा उच्चार करून त्यावेळेस मसूर अर्पण करा. शनिवारी सकाळी आंघोळ केल्यानंतर आपल्या लांबीएवढा काळा धागा घेऊन नारळावर गुंडाळा. त्यानंतर आपल्या नियमित पूजेसह त्याची पूजा करा. पूजेनंतर हा नारळ वाहत्या पाण्यात वाहून द्यावा आणि देवाकडे कर्जमुक्तीसाठी प्रार्थना करावी. या छोट्याशा उपायाने तुम्हाला तुमच्या मेहनतीचे उत्तम फळ मिळू शकेल आणि लवकरच तुमच्यावरील कर्जाचा बोजा कमी होऊ लागेल.
कर्जमुक्तीचा रामबाण उपाय म्हणजे गजेंद्र मोक्षाचा धडा. शनिवारी ऋणमुक्तेश्वर महादेवाची पूजा करावी.
मंगळवारी तीन वेळा मंगलस्त्रोत पाठ करा, त्यानंतर एकदा हनुमान चालिसाचा पाठ करा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)