प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील आठवी तिथी कालाष्टमी म्हणून ओळखली जाते. या दिवशी हिंदू भाविक भगवान भैरवाची पूर्ण भक्तिभावाने पूजा करतात आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी व्रत देखील करतात. वर्षभरात १२ कालाष्टमी असतात. भगवान शिवाचे रुद्र रुप कालभैरव देवाची या दिवशी विशेष पूजा केली जाते.
दर महिन्याला कालाष्टमी हा सण साजरा केला जातो. फाल्गुन महिन्यात, हे व्रत रविवारी (३ मार्च) पाळले जाईल. जर तुम्हाला भैरव नाथांचा आशीर्वाद घ्यायचा असेल, तर तुम्हाला या दिवसाशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत.
भाविक सकाळी उठून स्नान करतात. यानंतर व्रत संकल्प करा. मग आपले घर आणि देवघर स्वच्छ करा. भैरवनाथाची मूर्ती लाकडी पीठावर बसवावी. त्यांना पंचामृताने स्नान घालावे. यानंतर स्वच्छ कापडाने पुसून घ्या. अत्तर लावा आणि फुलं अर्पण करा.
यानंतर चंदनाचा तिलक लावावा. फळं, मिठाई इत्यादी अर्पण करा. देवासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि काल भैरव अष्टक पठण करा. आरतीने तुमची पूजा पूर्ण करा. शेवटी पूजेच्या वेळी झालेल्या चुकीबद्दल माफी मागावी. उपवास करणारा दुसऱ्या दिवशी प्रसाद ग्रहण करून उपवास सोडावा.
सनातन धर्मात कालाष्टमीचे व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी भोलेनाथाचे रूप असलेल्या काळभैरवाची अनेक प्रकारे पूजा केली जाते. भगवान कालभैरव हे भगवान शिवाचे उग्र रूप आहे. असे म्हणतात की जे भक्त पूर्ण समर्पण आणि भक्तीभावाने त्यांची पूजा करतात त्यांना वाईट शक्तीपासून मुक्ती मिळते.
याशिवाय ज्यांना काळी जादू, वाईट नजर किंवा कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक उर्जेचा त्रास आहे त्यांनी या दिवशी उपवास करावा.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)