प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील आठवी तिथी कालाष्टमी म्हणून ओळखली जाते. या दिवशी हिंदू भाविक भगवान भैरवाची पूर्ण भक्तिभावाने पूजा करतात आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी व्रत देखील करतात. वर्षभरात १२ कालाष्टमी असतात. भगवान शिवाचे रुद्र रुप कालभैरव देवाची या दिवशी विशेष पूजा केली जाते. कालभैरवाचे भक्तगण या दिवशी उपवास करतात आणि त्यांची पूजा करतात.
कालाष्टमीचा दिवस विशेष मानला जातो. असे म्हटले जाते की शिवाच्या कालभैरव रूपाची पूजा केल्याने शिवभक्तांच्या जीवनातील सर्व दुःख, रोग आणि अडचणी दूर होतात. नववर्षातील ही पहिली मार्गशीर्ष अष्टमी तिथी असून, पहिल्या कालाष्टमीचे महत्त्व आणि मान्यता जाणून घ्या.
नवीन वर्षाची पहिली कालाष्टमी आज ४ जानेवारी २०२४ गुरुवार रोजी आहे. या दिवशी कालभैरवाची पूजा करावी. याशिवाय या दिवशी शिवाला अभिषेक केल्याने सुख आणि सौभाग्य वाढते. या दिवशी दुर्गेची पूजा करण्याचाही नियम आहे
मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी ३ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ७ वाजून ४८ मिनिटांनी सुरू झाली आहे आणि आज ४ जानेवारी २०२४ रोजी रात्री १० वाजून ४ मिनिटांनी समाप्त होईल.
निशीथ काळ मुहूर्त – रात्री ११:४९ ते ५ जानेवारी दुपारी १२:५३ पर्यंत.
कालाष्टमीला चतुर्भुज दीप प्रज्वलित करून बाबा भैरवाचे स्मरण करा आणि नंतर भैरव कवच पठण करा. असे मानले जाते की, जर राहु-केतू कोणत्याही शुभ कार्यात वारंवार अडथळा आणत असतील आणि कार्यात यश मिळत नसेल तर या उपायाने दोन्ही अशुभ ग्रह शांत होतात. हा उपाय सर्वत्र विजयासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो.
कालाष्टमीला नारळ, केशर, शेंदूर, सुपारी भगवान काल भैरवाला अर्पण करा आणि नंतर “ॐ तीखदन्त महाकाय कल्पान्तदोहनम्। भैरवाय नमस्तुभ्यं अनुज्ञां दातुर्माहिसि” - या मंत्राचा जप करावा. अशाप्रकारे पूजा केल्याने शनि, राहू आणि केतू यांच्या त्रासांपासून मुक्ती मिळते. हनुमानानंतर, कालभैरव ही एकमेव देवता आहे जिच्या उपासनेने लवकर फळ मिळते अशी मान्यता आहे.
संबंधित बातम्या