ज्येष्ठ पौर्णिमेला संत कबीर यांची जयंती साजरी केली जाते. भारतातील प्रसिद्ध कवी आणि गूढ संत कबीर यांच्या प्रकटीकरणाच्या स्मरणार्थ कबीर जयंती साजरी केली जाते. त्यांच्या जन्मतारखेवरही काही मतभेद आढळतात.
संत कबीर यांचा जन्म ज्येष्ठ शुक्ल पूर्णिमा इ.स. ११४९ साली झाला असे काहीजण मानतात तर, कुणी ते १३९९ मध्ये जन्माला आले असे म्हणतात. तसेच कबीर हे ब्रह्ममुहर्ताच्या वेळी ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी कमळाच्या फुलावर प्रकट झाल्याचे सांगितले जाते. ज्येष्ठ पौर्णिमेस काशीमधील लहरतारा नावाच्या सरोवरात एक प्रखर तेजस्वी प्रकाशामध्ये संत कबीर एका कमळाच्या फुलावर प्रकट झाले. हा सर्व प्रसंग तेथे असलेल्या अष्टानंदऋषींनी पाहिला होता.
संत कबीर यांनी तत्कालीन प्रचलित असणाऱ्या धर्मातील अंधश्रद्धा व अनिष्ट प्रथा यावर दोह्याच्या माध्यमातून टीका केली. त्यांच्या लिखाणामुळे तत्कालीन अनिष्ट प्रथा आणि अंधश्रद्धा पसरवणारे भोंदू बाबा व बुवा सनातनी यांचे धाबे दणाणले होते. त्यांचा लिखाणामुळे संत कबीर संपूर्ण जगाममध्ये प्रसिद्ध झाले. संत कबीर यांची जयंती फक्त देशातच नव्हे तर विदेशातही साजरी केली जाते.
अंधश्रद्धेवर कठोर प्रहार करून
मानवतावादी मूल्यांची शिकवण देणारे
सत्पुरुष संत कबीर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
…
जीवनदर्शनाचा मंत्र जगाला देणारे
संत कबीर यांना जयंतीनिमत्त विनम्र अभिवादन
…
सत्याच्या मार्गावर चालायला प्रेरित करते
संत कबीर यांची वाणी
संत कबीर जयंतीच्या शुभेच्छा!
…
जीवनदर्शनाचा मंत्र जगाला देणारे
संत कबीर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
आनंदी राहण्यासाठी आणि एक संघटित जीवन जगण्यासाठी,
कबीर वाचा आणि तुम्हाला तुमच्या सर्व चिंताची उत्तरे सापडतील
संत कबीर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि शुभेच्छा
…
बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलिया कोय,
जो दिल खोजा आपना, मुझसे बुरा न कोय।
…
जाति न पूछो साधु की, पूछ लीजिये ज्ञान,
मोल करो तरवार का, पड़ा रहन दो म्यान।
निंदक नियरे राखिए, ऑंगन कुटी छवाय ।
बिन पानी, साबुन बिना, निर्मल करे सुभाय ।।
कबीर दास जी म्हणतात की जे तुमच्यावर टीका करतात त्यांना नेहमी सोबत ठेवावे. कारण ते लोक तुमचे दोष तुमच्यासमोर ठेवतात, ज्या सुधारून तुम्ही नेहमी प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल.
…
काल करे सो आज कर, आज करे सो अब ।
पल में प्रलय होएगी,बहुरि करेगा कब ॥
कबीर दास जी म्हणतात की कोणतेही कार्य उद्यावर टाळू नये, जे करायचे आहे ते आजच करावे आणि ते आत्ताच या क्षणी करावे. कुणालाच ठाऊक नाही, पुढच्या क्षणी प्रलय आलं तर आयुष्य संपेल, मग जे करायचं ते कधी करणार.