महादेव, देवांचा देव, भगवान शिव यांची अनेक रूपे आहेत आणि अनेक नावांनी त्यांची ओळखही आहे. यातील एक कालभैरव. कालभैरव जयंती शनिवार २३ नोव्हेंबरला साजरी होणार आहे. कालभैरव हे भगवान शिवाच्या रूपाला समर्पित आहे. याला कालाष्टमी असेही म्हणतात. या दिवशी भगवान शंकराच्या कालभैरव रूपाची पूजा केल्याने जीवनातील अडथळे आणि समस्या दूर होतात. नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. काल भैरव ही शक्ती आणि धैर्याची देवता मानली जाते. यामुळेच त्यांची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व दु:ख आणि कष्ट नष्ट होतात. मृत्यूची भीती संपते.
दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालभैरव जयंतीचे आयोजन केले जाते. धार्मिक परंपरेनुसार या दिवशी काल भैरवाचा अवतार झाला होता. असे मानले जाते की, कालाष्टमीच्या दिवशी कालभैरवाची पूजा केल्याने जीवनातील नकारात्मक शक्तींपासून मुक्ती मिळते.
उदया तिथीनुसार, २३ नोव्हेंबर रोजी कालाष्टमी, कालभैरव जयंती साजरी केली जाईल. भैरव अष्टमीनिमित्त ब्रह्मयोग, इंद्र योग आणि रवियोग तयार होत आहेत. या योगांमध्ये भगवान शंकराचे रूद्र रूप असलेल्या कालभैरवाचे पूजन केल्याने साधकाला सर्व प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक त्रासांपासून मुक्ती मिळून सुख-समृद्धी प्राप्त होते आणि शत्रूंवर विजय प्राप्त होतो. कालभैरव जयंती निमित्त आपल्या प्रियजणांना पाठवा हे शुभेच्छा संदेश.
ॐ काल भैरवाय नमः
कालभैरव जयंतीच्या शुभेच्छा
...
काल भैरवाष्टकचा करा जप
कालाष्टमीच्या दिवशी होईल
महादेवाची कृपा
कालभैरव जयंतीच्या शुभेच्छा
...
या कालभैरव जयंतीला
तुम्हाला सुख-समृद्धी शांती लाभो
हीच महादेवाचरणी प्रार्थना
कालभैरव जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा
...
काली माताचा पुत्र
भगवान कालभैरव
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो.
तुम्हा सर्वांना कालाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
...
ज्याच्या आश्रयाला सर्व विश्व नतमस्तक होते,
त्या कालभैरवाच्या चरणी विनम्र अभिवादन.
कालाष्टमीच्या आणि कालभैरव जंयतीच्या
माझ्या प्रियजणांना खूप खूप शुभेच्छा
...
देवराज सेव्यमानपावनांध्वि पंकजं ।।
व्याल यज्ञसूत्रमेंदुशेखरं कृपा करम् ।।
नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगंबरं ।।
काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे...
कालभैरव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
...
काल भैरवाष्टकं पठन्ति ये मनोहरं ।।
ज्ञानमुक्ति साधनं विचित्र पुण्यवर्धनं ।।
शोक मोह दैन्य लोभ कोप ताप नाशनम् ।।
प्रयान्ति कालभैरवांध्रिंसन्निधिं नराध्रुवम् ।।
काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे.
कालभैरव जयंती निमित्त शुभेच्छा
....