अनेकदा असे घडते की मुलगा आणि मुलगी यांच्यात मैत्री तर होते, पण ती पुढे लग्नापर्यंत वाढत नाही आणि हे नाते प्रेमाच्या टप्प्यावर पोहोचण्यापूर्वीच तुटते. जर तुमच्याही आयुष्यात असे वारंवार घडत असेल आणि तुम्हाला अजूनही खरा जीवनसाथी मिळाला नाही. तर आपण या ठिाकणी काही उपाय पाहणार आहोत. हे उपाय खरा जोडीदार मिळवण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकतात.
एक छोटी काचेची बाटली घ्या आणि त्यात मध भरा. आता कागदाचा एक छोटा तुकडा घ्या आणि त्यावर तुमच्या जोडीदाराचे किंवा जी तुम्हाला आवडत आहे त्या व्यक्तीचे नाव लिहा. आता तो कागद मधाने भरलेल्या बाटलीत ठेवा आणि घराच्या पश्चिम दिशेला ठेवा. हा उपाय केल्यावर १६ दिवसांनी तुम्हाला त्याचा परिणाम दिसू लागेल.
तुम्हाला प्रिय असलेली व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होऊ लागेल आणि तुमच्यावर प्रेम करू लागेल. हा उपाय विवाहित व्यक्ती देखील करू शकतात. वैवाहिक जीवनात गोडवा वाढवण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी ठरेल.
खरा जोडीदार मिळवण्यासाठी दुसरा उपाय म्हणजे आंघोळीच्या पाण्यात थोडे दूध आणि साखर मिसळा. या उपायाचा अवलंब केल्याने तुम्हाला तुमच्या आवडीचा जोडीदार मिळण्यास मदत होईल. या उपायाचा अवलंब करून तुम्ही इच्छिता व्यक्तीला आकर्षित करू शकाल. हा उपाय रोज २१ दिवस केल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
तुम्हाला तुमच्या आवडत्या व्यक्तीला तुमच्याकडे आकर्षित करायचे असेल, तर आंघोळीनंतर परम्युमने हा उपाय करा.
आंघोळीनंतर तुमच्या प्रिय व्यक्तीचे नाव मनातल्या मनात म्हणाला आणि परफ्युम किंवा अत्तर तुमच्या चारही बाजूने शिंपडा. हा उपाय केल्याने लोक तुमच्याकडे आकर्षित होतील.
जर तुमचे वय उलटून जात असेल आणि तुम्हाला चांगला जीवनसाथी किंवा खरे प्रेम मिळत नसेल तर हा उपाय केल्याने तुम्हाला खूप फायदा होईल. तुम्ही तुमच्या अंगठीच्या बोटात डायमंड किंवा ओपलची अंगठी घालावी. हा उपाय केल्यास तुमच्या जीवनातील खऱ्या जोडीदाराची उणीव पूर्ण होईल आणि तुमचे जीवन आनंदी होईल.
खरा जीवनसाथी मिळवण्यासाठी दर शुक्रवारी गायीची सेवा करा आणि तिला हिरवा चारा खाऊ घाला. गायीला मातेचा दर्जा दिला आहे. गाईची सेवा केल्याने तुमचा शुक्र ग्रह बलवान होतो आणि जेव्हा तो बलवान होतो, तेव्हा तुमचा खरा जीवनसाथीचा शोध पूर्ण होतो.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती धार्मिक मान्यतांवर आधारित आहे. ती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे, असा हिंदुस्तान टाइम्स मराठीचा दावा नाही. त्यामुळं अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला जरूर घ्या.)