हिंदू धर्मानुसार आज ज्येष्ठ पौर्णिमेचा दिवस आहे. आज ज्येष्ठ पौर्णिमेचा व्रत ठेवला जाणार आहे. त्यांनंतर उद्या ज्येष्ठ पौर्णिमेचे स्नान आणि दान केले जाईल. ज्येष्ठ पौर्णिमेचा दिवसच वट पौर्णिमा म्हणून ओळखला जातो. हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ पौर्णिमा तिथी आज सकाळी ७ वाजून ३१ मिनिटांनी ते शनिवारी म्हणजेच उद्या सकाळी ६ वाजून ३७ मिनिटापर्यंत आहे. शिवाय ज्येष्ठ पौर्णिमेचा चंद्रोदय आज संध्याकाळी ७ वाजून ४ मिनिटांनी होईल. आणि उद्या सकाळी ५ वाजून ११ मिनिटांनी सूर्यास्त होईल.
शास्त्रानुसार आज सायंकाळी चंद्राचे पूजन करण्यात येईल. ज्या लोकांना ज्येष्ठ पौर्णिमेचे स्नान करायचे आहे, तो व्यक्ती शुक्ल योगातील ब्रह्म मुहूर्तावर पहाटे ४ वाजून ४ मिनिटांनी ते ४ वाजून ४४ मिनिटांदरम्यान स्नान करू शकतो. महत्वाचे म्हणजे हे स्नान सूर्योदयानंतरही करता येते. ज्योतिष अभ्यासानुसार ज्येष्ठ पौर्णिमेचा व्रत आणि ज्येष्ठ पौर्णिमेचे स्नान दोन्हीही चंद्रदोष दूर करण्यासाठी लाभदायक ठरतात. शास्त्रात चंद्रदोष दूर करण्याचे ५ महत्वाचे उपाय सुचविण्यात आले आहेत. हे उपाय नेमके कोणते आहेत ते आपण जाणून घेऊया.
ज्येष्ठ पौर्णिमेला चंद्रदोष दूर करण्यासाठी पहिला उपाय म्हणजे चंद्राचे पूजन होय. यादिवशी दिवसभर उपवास करुन, सायंकाळच्यावेळी चंद्राचे पूजन केले जाते. पूजा करताना सर्वप्रथम चंद्राचे दर्शन घ्या. त्यानंतर चांदीच्या ग्लासमध्ये पाणी आणि कच्चे दूध घ्या. त्यात पांढरी फुले, पांढरे चंदन आणि अक्षता टाकून ते जल चंद्राला अर्पण करावे.
चंद्राला जल अर्पण करताना म्हणजेच अर्ध्य देताना ''गगनार्णवमाणिक्य चन्द्र दाक्षायणीपते। गृहाणार्घ्यं मया दत्तं गणेशप्रतिरूपक॥'' या पवित्र मंत्राचा जप करावा. त्याचा विशेष लाभ पाहायला मिळतो.
चंद्राच्या बीज मंत्राचा जप करावा
ज्येष्ठ पौर्णिमेचा दिवस चंद्र दोष दूर करण्यासाठीऊ अत्यंत चांगला समजला जातो. शास्त्रानुसार कुंडलीतील चंद्र दोष दूर करण्यासाठी चंद्र बीज मंत्राचा जप करावा. खासकरुन यासाठी मोत्यांचे मणी असलेली जपमाळ वापरावी.
चंद्राचा अशुभ प्रभाव टाळण्यासाठी संबंधित व्यक्तीने गळ्यात चांदीचा चंद्र धारण करावा. हा चंद्र तुम्ही पांढरा धागा किंवा चांदीच्या साखळीत घालू शकता. खासकरुन सोमवारी किंवा कोणत्याही पौर्णिमेच्या दिवशी चांदीचा चंद्र परिधान करू शकता. या आभूषणाने चंद्रदोष दूर होण्यास प्रचंड फायदा होणार आहे.
रत्नशास्त्रानुसार प्रत्येक दोष दूर करण्यासाठी एक खास रत्न धारण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यानुसार चांदी हा चंद्रासाठी अत्यंत शुभ धातू समजला जातो. शिवाय चंद्रासाठी मोती हा शुभ रत्न आहे. कुंडलीतील चंद्र दोष दूर करण्यासाठी तुम्ही चांदीचे दागिने घालू शकता. याशिवाय तुम्ही चांदी आणि मोत्याची अंगठीही घालू शकता. तुम्हाला याचा विशेष फायदा होईल. परंतु यापूर्वी एकदा ज्योतिषशास्त्राचा सल्ला घेणे उपयोगी ठरेल.
ज्येष्ठ पौर्णिमेदिवशी तिथीनुसार योग्य मुहूर्तावर स्नान उरकून घ्यावा. त्यांनंतर पांढरे वस्त्र परिधान करुन चंद्राचे पूजन करावे. त्यांनंतर आपल्या क्षमतेप्रमाणे पांढरे वस्त्र, तांदूळ, साखर, मोती, चांदी अशा वस्तूंचे दान करावे. यामुळे चंद्रदेव खुश होतात. आणि म्हणूनच चंद्रदोष दूर व्हायला मदत होते. तसेच सोमवारच्या दिवशीसुद्धा ज्योतिषांच्या सल्ल्याने चंद्रदोष दूर करण्याचे उपाय केले जाऊ शकतात.
संबंधित बातम्या