ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या खूप महत्त्वाची मानली जाते. असे मानले जाते की हा दिवस पूजेसाठी खूप खास आहे. त्याचबरोबर गंगा स्नान आणि पितरांना तर्पण अर्पण करण्यासाठीही ही तिथी अतिशय शुभ मानली जाते. यंदा ज्येष्ठ अमावस्या ६ जून २०२४ रोजी साजरी केली जाईल.
या दिवसासंदर्भात ज्योतिषशास्त्रात अनेक नियम सांगितले आहेत, ज्यांचे पालन प्रत्येकाने केले पाहिजे, तर चला तर मग जाणून घेऊया पितरांना प्रसन्न करण्याचे सोपे उपाय.
असे मानले जाते की ज्येष्ठ अमावस्येला काळे तीळ पितरांना अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो, कारण तीळ हे पितरांचे प्रतीक मानले जाते. अशा स्थितीत स्नान करून गंगा नदीत काळे तीळ सोडल्याने आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते. तसेच ते आनंदी होतात.
या दिवशी संध्याकाळी पितरांसाठी दक्षिण दिशेला चौमुखी असलेला तेलाचा दिवा लावावा. हा दिवा पितरांचे मार्ग प्रकाशित करते आणि तुम्हाला त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतील.
जेष्ठ अमावस्येच्या दिवशी सुके नारळ नदीत किंवा वाहत्या पाण्यात प्रवाहित करावे. असे केल्याने तुम्ही कालसर्प दोषापासून देखील मुक्त होऊ शकता.
पंचांगानुसार, ज्येष्ठ अमावस्या बुधवारी ५ जून २०२४ रोजी संध्याकाळी ०७:५४ वाजता सुरू होईल. त्याच वेळी, ते दुसऱ्या दिवशी गुरूवारी ६ जून २०२४ रोजी संध्याकाळी ०६:०७ वाजता संपेल. पंचांगानुसार, ६ जून २०२४ रोजी ज्येष्ठ अमावस्या साजरी केली जाईल.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती धार्मिक मान्यतांवर आधारित आहे. ती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे, असा हिंदुस्तान टाइम्स मराठीचा दावा नाही. त्यामुळं अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला जरूर घ्या.)