मराठी बातम्या  /  Religion  /  Jyeshta Vinayak Chaturthi 2023

Jyeshta Vinayak Chaturthi 2023 : जेष्ठ महिन्यातली विनायक चतुर्थी कधी आहे?

विनायक चतुर्थी
विनायक चतुर्थी (HT)
Dilip Ramchandra Vaze • HT Marathi
May 20, 2023 09:55 AM IST

Vinayak Chaturthi : जेष्ठ महिन्याची सुरूवात झाली आहे आणि जेष्ठ महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात विनायक चतुर्थीचं व्रत आपण साजरं करणार आहोत.

श्रीगणेश. कोणत्याही गोष्टीची सुरूवात करताना त्याचा श्रीगणेशा करा असं सांगितलं जातं. श्रीगणेश ही बुद्धीची देवता इतकी प्रिय आहे की, कोणत्याही शुभ कार्याचा आरंभ म्हणजेच शुभ कार्याचा श्रीगणेशा गणपतीच्या पूजेनं केला जातो. सध्या जेष्ठ महिन्याची सुरूवात झाली आहे आणि जेष्ठ महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात विनायक चतुर्थीचं व्रत आपण साजरं करणार आहोत. श्रीगणेश ही बुद्धीची देवता आहे. बुद्धीच्या याच देवतेला आपण प्रसन्न करून घेणार आहोत. चला तर पाहूया जेष्ठ महिन्यात कधी साजरी केली जाणार विनायक चतुर्थी.

ट्रेंडिंग न्यूज

जेष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातली चतुर्थी आपण विनायक चतुर्थी म्हणून साजरी करणार आहोत. २० मे २०२३ रोजी विनायक चतुर्थी व्रत पाळलं जाईल.

ज्येष्ठ विनायक चतुर्थीचे मुहूर्त कोणते?

पंचांगानुसार, ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थी २२ मे २०२३ रोजी रात्री ११.१७ वाजता सुरू होईल आणि २४ मे २०२३ रोजी दुपारी १२.५६ वाजता समाप्त होईल. उदयतिथीनुसार ज्येष्ठ विनायक चतुर्थी व्रत २३ मे रोजीच पाळलं जाईल. या दिवशी श्री गणेशाची विधीवत पूजा केली जाईल.

गणपती पूजेची वेळ - सकाळी १०.५५ ते दुपारी ०१.४१ पर्यंत.

विनायक चतुर्थीचं व्रत केल्याचे फायदे काय आहेत?

१. चतुर्थीचे व्रत पाळल्याने विघ्नं दूर होतात. गणपती बाप्पा घरातील सर्व संकटे दूर करतात.

२. चतुर्थीचे व्रत ठेवल्याने आर्थिक लाभ होतो.

३. जीवनात शांती हवी असेल तर चतुर्थीचे व्रत करावे.

४. चतुर्थीचे व्रत केल्याने सर्व प्रकारची मानसिक अस्वस्थता दूर होते.

५. लग्नात येणारे अडथळे दूर करण्यासाठी चतुर्थीचे व्रत विधिवत करावं असं सांगितलं जातं .

६. मुलांशी संबंधित काही समस्या असल्यास चतुर्थीचे व्रत केल्यास ही समस्या दूर होते.

७. चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाला दुर्वा अर्पण करून विशेष पूजा केली जाते. असे केल्याने कुटुंबात समृद्धी वाढते.

८. कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल तर चतुर्थीचे व्रत करावे. गणपती सर्व मनोकामना पूर्ण करतात.

९. चतुर्थीला गणपतीची पूजा केल्याने घरातील नकारात्मक प्रभाव दूर होतो.

१०. चतुर्थीला व्रत पाळल्यामुळे आनंद आणि सौभाग्य वाढते.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग