भारतात संस्कृती, परंपरा, सण-उत्सव यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. प्रत्येक धर्माच्या संस्कृती, परंपरा, चालिरिती, सण-उत्सव यांमध्ये वैविध्य आहे. प्रत्येक महिन्यात काही ना काही सण-उत्सव सुरुच असतात. जून महिना सुरू व्हायला अवघे काही दिवस बाकी आहे. जून महिन्यातच ज्येष्ठ महिना सुरू होईल.
जून महिन्यात एकादशी, गंगा सप्तमी, वट पौर्णिमेसह अनेक मुख्य सण-उत्सव साजरे केले जातील. वट पौर्णिमेचा उत्सव स्त्रियांसाठी खास मानला जातो. स्त्रियांनो तुम्हीही कोणती साडी घालायची? कोणती ज्वेलरी घालायची? संपूर्ण तयारीची आतापासूनच सुरवात करू शकतात. या सर्व सण-उत्सव आणि व्रत-वैकल्याला कोणती तारीख, वार, तिथी आहे नोंद करून घ्या, तसेच जाणून घ्या मुख्य सण-उत्सवाचे थोडक्यात महत्व.
रविवार २ जून - अपरा स्मार्त एकादशी
सोमवार ३ जून - भागवत एकादशी
मंगळवार ४ जून- मासिक शिवरात्री, भौम प्रदोष व्रत
बुधवार ५ जून - अमावस्या
गुरुवार ६ जून- शनि जयंती, वैशाख अमावस्या
शुक्रवार ७ जून- चंद्रदर्शन, करिदिन, गंगादशहरा प्रारंभ
रविवार ९ जून - महाराणा प्रताप जयंती(तिथीप्रमाणे)
सोमवार १० जून- विनायक चतुर्थी व्रत
बुधवार १२ जून - अरण्यषष्ठी
शुक्रवार १४ जून- मासिक दुर्गाष्टमी व्रत
रविवार १६ जून - गंगादशहरा समाप्ती
सोमवार १७ जून- इद उल जुहा (बकरीद), गोपाळ गणेश आगरकर पुण्यतिथी, राजमाता जिजाऊसाहेब भोसले पुण्यतिथी(तारखेप्रमाणे)
मंगळवार १८ जून - निर्जला एकादशी
बुधवार १९ जून- प्रदोष व्रत
गुरुवार २० जून - शिवराज शक ३५१ प्रारंभ, शिवराज्याभिषेकोत्सव दिन, सौर वर्षा ऋतू प्रारंभ
शुक्रवार २१ जून- वटपौर्णिमा, अयन करीदिन, सूर्याचा आद्रा नक्षत्र प्रवेश, आंतरराष्ट्रीय योग दिन
शनिवार २२ जून - कबीर जयंती
मंगळवार २५ जून - अंगारक संकष्टी चतुर्थी
बुधवार २६ जून - छत्रपती शाहू महाराज जयंती
शुक्रवार २८ जून- कालाष्टमी
रविवार ३० जून - राजमाता जिजाऊसाहेब भोसले पुण्यतिथी(तिथीप्रमाणे)
ज्येष्ठ मासातील दशमी या तिथीला गंगा दशहरा साजरा केला जातो. वास्तविक ज्येष्ठ प्रतिपदेपासून गंगा दशहराला सुरुवात होते. हा उत्सव ज्येष्ठ शुद्ध दशमीपर्यंत सुरू राहतो. या दिवशी गंगा नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानले जाते.
ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षात येणारी एकादशी निर्जला एकादशी या नावाने साजरी केली जाते. या दिवशी श्रीविष्णूंची उपासना केली जाते. पुराणात निर्जला एकादशीचे महत्त्व विशेषत्वाने विषद करण्यात आले आहे. वर्षभरातील २४ एकादशींचे व्रत करता आले नाही, तर एक निर्जला एकादशीचे एकच व्रत करावे. त्यामुळे वर्षभरातील एकादशीचे व्रत केल्याचे पुण्य मिळते, असे सांगितले जाते.
ज्येष्ठ पौर्णिमेला वटसावित्रीचे पूजन करण्याची परंपरा प्राचीन काळापासून सुरू आहे. ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजेच वटसावित्री पौर्णिमा आहे. महिलांसाठी वटसावित्रीचा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पतीला दीर्घायुष्य मिळावे, यासाठी वटसावित्रीच्या दिवशी प्रार्थना केली जाते. वडाच्या झाडाचे पूजन केले जाते.
संबंधित बातम्या