ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील दशमी तिथीपासून जुलै महिना सुरू होत आहे. जुलै महिन्यातच आषाढ महिनाही प्रारंभ होईल. अशात या महिन्यात कोण-कोणते मुख्य सण-उत्सव आहे, वाचा संपूर्ण यादी.
प्रत्येक महिन्याला खास महत्व आणि आगळे-वेगळे वैशिष्ट्य आहे. ऋतूचक्रानुसार प्रत्येक महिना हा अनेक सण-उत्सवांनी आणि शुभ तिथींनी भरलेला असतो. आपल्याकडे अनेक वैविध्य अशा संस्कृती आणि परंपरांना जन्म दिला आहे.
जुलै महिन्याची सुरुवात पहिल्या दिवशीच अनेक महत्त्वाच्या दिवसांनी होते. नॅशनल डॉक्टर्स डे, कॅनडा डे, सीए डे (भारतात) इत्यादी दिवस. जुलैचे नाव रोमन हुकूमशहा गायस ज्युलियस सीझर याच्या नावावर आहे
हिंदू कॅलेंडरनुसार जुलै हा या वर्षाचा चौथा महिना आहे जो आषाढ महिना म्हणून ओळखला जातो. या काळात पुरी जगन्नाथ रथयात्रा, गुप्त नवरात्री, प्रदोष व्रत आणि कामिका एकादशी महिन्याची समाप्ती होईल.
जून महिना संपून आता जुलै महिन्याचे सर्वांना वेध लागले आहेत. हा महिना विठ्ठल भक्तांसाठी खास आहे, कारण या महिन्यात वारकऱ्यांच्या वारींनी पंढरपूर दुमदुमून जाईल. पावसाळा, पंढरपूर यात्रा, चातुर्मास्यारंभ आणि गुरु पौर्णिमेसह जुलै महिन्यात कोण-कोणते महत्वाचे सण-उत्सव आहे. चला जाणून घेऊया जुलै महिन्यातील मुख्य सणउत्सवांची संपूर्ण यादी.
मंगळवार २ जुलै - योगिनी एकादशी
बुधवार ३ जुलै - प्रदोष, संत निवृत्तीनाथ संजीवन समाधी दिन
गुरुवार ४ जुलै - शिवरात्री
शुक्रवार ५ जुलै - दर्श अमावस्या
शनिवार ६ जुलै - महाकवी कालिदास दिन, गुप्त नवरात्र प्रारंभ
रविवार ७ जुलै - जगन्नाथ रथयात्रा, चंद्र दर्शन
मंगळवार ९ जुलै - विनायक चतुर्थी (अंगारक योग)
रविवार १४ जुलै - दुर्गाष्टमी
बुधवार १७ जुलै - देवशयनी एकादशी, चातुर्मास्यारंभ, पंढरपूर यात्रा, करिदिन, मोहरम
शुक्रवार १९ जुलै - प्रदोष
रविवार २१ जुलै - गुरुपौर्णिमा, व्यासपूजन
मंगळवार २३ जुलै - लोकमान्य टिळक जयंती
बुधवार २४ जुलै - संकष्ट चतुर्थी
रविवार २८ जुलै - कालाष्टमी
बुधवार ३१ जुलै - कामिका एकादशी
जुलै महिन्यात मराठी महिना आषाढ असणार आहे. या काळात भगवान विठ्ठल आणि श्री हरीची पूजा करण्याची परंपरा आहे. म्हणून त्यांच्या वैदिक मंत्रांचा जप करा. सूडबुद्धीच्या गोष्टींपासून दूर राहा. सूर्योदयापूर्वी उठा. गरजू लोकांना मदत करा. धार्मिक कार्यांशी जोडलेले राहा. यासह कोणत्याही व्यक्तीशी गैरवर्तन करणे टाळा.
संबंधित बातम्या