मराठी बातम्या  /  धर्म  /  Joshimath Prediction : उत्तराखंडच्या जोशीमठाची भविष्यवाणी खरी ठरणार का?

Joshimath Prediction : उत्तराखंडच्या जोशीमठाची भविष्यवाणी खरी ठरणार का?

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Jan 09, 2023 10:31 AM IST

Kalyug Joshimath Prediction : आता हा एंट्री पॉइंटच धोक्यात असल्याने चारधामांपैकी एक असणाऱ्या बद्रिनाथाचं दर्शन कसं होणार याचं कोडं आता भाविकांना पडू लागलं आहे. अशातच जोशीमठाबाबत एक भविष्यवाणी समोर येताना पाहायला मिळत आहे.

बद्रिनाथ मंदिर
बद्रिनाथ मंदिर (हिंदुस्तान टाइम्स)

उत्तराखंड इथल्या जोशीमठ परिसराचं अस्तीत्व धोक्यात आल्याच्या बातम्या सध्या पाहायला मिळत आहेत. लोकांच्या घरांवर, रस्त्यांवर पडलेल्या मोठमोठ्या भेगा धडकी भरवणाऱ्या आहेत. नागरिकांचं मोठ्या प्रमाणावर स्थलांतर केलं जात आहे.लोकं रात्रीच्या वेळेस मशाल मोर्चे काढत आहेत. अशा बातम्या सध्या पाहायला मिळत आहेत.

जोशीमठ हे बाबा बद्रिनाथ यांच्या दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक भाविकासाठी एंट्री पॉइंट आहे. मात्र आता हा एंट्री पॉइंटच धोक्यात असल्याने चारधामांपैकी एक असणाऱ्या बद्रिनाथाचं दर्शन कसं होणार याचं कोडं आता भाविकांना पडू लागलं आहे. अशातच जोशीमठाबाबत एक भविष्यवाणी समोर येताना पाहायला मिळत आहे.

जोशीमठ म्हणजे जेव्हा आदि शंकराचार्य चार धामांच्या स्थापनेसाठी दौरे करत होते, त्यावेळी त्यांनी जोशीमठ येथे एका झाडाखाली तप केले आणि येथे ज्योतिषाचे ज्ञान घेतले. म्हणूनच जोशीमठला ज्योतिर्मठ आणि ज्योतिषपीठ म्हणूनही ओळखले जाते. शंकराचार्यांनीही येथे भगवान नरसिंहाची मूर्ती स्थापन केली होती. कारण जोशीमठ हे भगवान नरसिंहाचे तपस्थानही मानले जाते. पूर्वी जोशीमठ समुद्रात वसले होते अशी आख्यायिका आहे. जेव्हा ते पर्वताच्या रूपात उभे राहिले, तेव्हा भगवान नृसिंहांनी ते आपले तप केले.

 

काय आहे भविष्यवाणी?

जोशीमठ येथील नरसिंह मंदिर हे भगवान बद्रीनाथांचे स्थान आहे. येथील मंदिरात नरसिंहाची एक प्राचीन मूर्ती आहे. याच भगवान नरसिंहाच्या मूर्तीबाबत अनेक समजुती आहेत. भगवान नरसिंहाचा एक हात सामान्य आहे तर दुसरा हात अतिशय बारीक आहे आणि तो वर्षानुवर्षे आणखीनच पातळ होत आहे. असे मानले जाते की ज्या दिवशी भगवान नरसिंहांचा हा  बारीक हात तुटेल, त्या दिवशी बद्रीनाथचा मार्ग बंद होईल. नर नारायण पर्वत एक होईल. भगवान बद्रीनाथ सध्या ज्या मंदिरात भक्तांना दर्शन देत आहेत त्या मंदिरात भगवान बद्रीनाथचे भक्तांना दर्शन होणार नाही. कारण नर-नारायण पर्वत एकत्र आल्यामुळे बद्रीनाथ धाम नाहीसा होईल. यानंतर भाविकांना भविष्यात बद्रीत भगवान बद्रीनाथाचे दर्शन घेता येणार आहे.

(या लेखात दिलेली माहिती, पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही आणि त्यांचा अवलंब केल्यास अपेक्षित परिणाम मिळेल असाही आम्ही दावा करत नाही)

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग