Jaya Ekadashi Shubhechha In Marathi : एका वर्षात २४ एकादशी व्रत पाळले जातात, जे सर्व भगवान विष्णूच्या उपासनेला समर्पित आहेत. असे मानले जाते की या तिथीला तिची पूजा केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते आणि धनाची देवी लक्ष्मीही प्रसन्न होते. पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला जया एकादशी साजरी केली जाते आणि यावर्षी ८ फेब्रुवारी २०२५ रोजी जया एकादशीचे व्रत केले जात आहे.
माघ शुक्लातील जया एकादशी ही सर्वात महत्त्वाची आहे. या दिवशी सृष्टीचे नियंता भगवान श्री हरी यांची आराधना करून व्रत पाळल्याने भक्ताला मोक्ष प्राप्त होतो, एवढेच नाही तर परमेश्वराच्या प्रभावाने भूत, नकारात्मक शक्ती आणि आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळते. या एकादशीच्या शुभ प्रसंगी तुम्ही पण तुमच्या प्रियजनांचा दिवस या शुभेच्छा संदेशांनी आणखी खास करू शकतात.
ऊं नारायणाय विद्महे। वासुदेवाय धीमहि।
तन्नो विष्णु प्रचोदयात्।।
एकादशी च्या खूप खूप शुभेच्छा
…
जया एकादशीच्या शुभ प्रसंगी
भगवान विष्णू तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो,
तुम्हाला एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
…
ॐ लक्ष्मी नारायण नमो नमः
भगवान विष्णूची कृपा तुम्हा-आम्हावर होवो
जया एकादशीच्या शुभेच्छा
…
भाव तिथ देव ही संताची वाणी
आचारा वाचून पाहिला कोणी?
शब्दांच्या बोलानं शांति नाही मनी ।
देव बाजारचा.
जया एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा
…
पंधरा दिवसां एक एकादशी । कां रे न करिसी व्रतसार ॥१॥
काय तुझा जीव जातो एका दिसें । फ़राळाच्या मिसें धनी घेसी ॥२॥
स्वहित कारण मानवेल जन । हरिकथ पूजन वैष्णवांचे ॥३॥
थोडे तुज घरीं होती उजगरे । देउळासी कां रे मरसी जातां ॥४॥
तुका म्हणे कां रे सकुमार झालासी । काय जाब देसी यमदुतां ॥५॥
जया एकादशीच्या मन:पूर्वक शुभेच्छा
…
लक्ष्मी वल्लभा
दीनानाथा पद्मनाभा
सुख वसे तुझे पायीं,
मज ठेवी तेचि पायी
एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
…
पाणी घालते तुळशीला
वंदन करते देवाला
सदा आंनदी ठेव माझ्या प्रियजनांना
जया एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
…
श्री हरी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या कृपेने
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत आणि
तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी सदैव नांदो.
जया एकादशीनिमित्त हार्दिक शुभेच्छा
…
ॐ श्री विष्णवे नम:
एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
संबंधित बातम्या