Jaya Ekadashi Upay: हिंदू धर्मात एकादशी व्रताला खूप महत्त्व आहे. हा दिवस श्री हरी विष्णूच्या उपासनेसाठी समर्पित करण्यात आलेला आहे. माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीच्या तिथीला जया एकादशी साजरी केली जाते. दृक पंचांगानुसार, जया एकादशी शनिवारी, ८ फेब्रुवारीला साजरी केली जात आहे. असे मानले जाते की, एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला सर्व पापांपासून मुक्ती मिळते. त्यास मोक्ष प्राप्त होतो आणि जीवनात सुख-समृद्धी येते. जया एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करण्याबरोबरच सुख आणि सौभाग्य प्राप्तीसाठी काही विशेष उपायदेखील केले जातात. जाणून घेऊया जया एकादशीचे सोपे उपाय...
जया एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची योग्य विधीपूर्वक पूजा करावी. लक्ष्मी आणि नारायणासमोर तुपाचा दिवा लावावा. असे मानले जाते की लक्ष्मीजी आणि विष्णू ची एकत्र पूजा केल्याने जीवनातील प्रगतीचे अडथळे दूर होतात.
तुळस हे जगाचे स्वामी श्री हरी विष्णू यांना अत्यंत प्रिय आहे. एकादशीच्या दिवशी विष्णूला तुळशीची पाने अर्पण करण्याबरोबरच तुळशीच्या झाडाची पूजा करणेही शुभ मानले जाते. या दिवशी संध्याकाळी तुळशीच्या झाडासमोर तुपाचा दिवा लावावा. विष्णूच्या 'ॐ विष्णुवे नम:' या मंत्राचा जप करा. असे केल्याने नकारात्मकता दूर होते आणि घरात सुख-समृद्धी येते, असे मानले जाते.
जया एकादशीच्या दिवशी विष्णूला प्रसन्न करण्यासाठी विष्णू सहस्रनाम किंवा नारायण कवचचे पठण करावे. असे केल्याने सर्व दुःखे आणि संकटे दूर होतात आणि जीवनात सुख येते, असे मानले जाते.
जया एकादशीच्या दिवशी तुम्ही धान्य, कपडे, फळे, गूळ आणि तीळ इत्यादींचे दान करू शकता. या दिवशी तुम्ही बेसनाचे लाडू, केशर खीर किंवा पिवळी फळे यासारखी पिवळी मिठाई विष्णूला दान करू शकता. असे केल्याने घरात सुख-शांती मिळते, असे मानले जाते.
जया एकादशीच्या दिवशी गायींची सेवा करता येते. असे केल्याने श्री हरि विष्णू प्रसन्न होतात, असे मानले जाते. या दिवशी गायींना खाऊ घाला आणि त्यांची सेवा करा. असे केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते, असे मानले जाते.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
संबंधित बातम्या