January 2025 Festival List In Marathi : नवीन वर्षाचा पहिला जानेवारी महिना धार्मिक दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मकर संक्रांत, पौष एकादशी, प्रदोष व्रत, शाकंभरी नवरात्र आणि पौर्णिमा तसेच पौष अमावस्या असे अनेक महत्त्वाचे सण जानेवारीत येत आहेत. जानेवारी २०२५ मध्ये महाकुंभाचे शाही स्नानही होणार आहे. जाणून घ्या जानेवारी २०२५ च्या सण-उत्सवाची संपूर्ण यादी.
बुधवार १ जानेवारी २०२५ - श्रीमन नृसिंह सरस्वती जयंती
शुक्रवार ३ जानेवारी २०२५ - विनायक चतुर्थी, सावित्रीबाई फुले जयंती
सोमवार ६ जानेवारी २०२५ - गुरु गोविंदसिंह जयंती
मंगळवार ७ जानेवारी २०२५ - दुर्गाष्टमी, शाकंभरी देवी नवरात्रारंभ
शुक्रवार १० जानेवारी २०२५ - पुत्रदा एकादशी
शनिवार ११ जानेवारी २०२५ - शनिप्रदोष
रविवार १२ जानेवारी २०२५ - स्वामी विवेकानंद जयंती, राजमाता जिजाऊसाहेब भोसले जयंती(तारखेप्रमाणे), सिद्धेश्वर यात्रा- सोलापूर,
सोमवार १३ जानेवारी २०२५ - शाकंभरी पौर्णिमा, शाकंभरी देवी नवरात्र समाप्ती, राजमाता जिजाऊसाहेब भोसले जयंती(तिथीप्रमाणे), धनुर्मास समाप्ती, भोगी, माघस्नानारंभ
मंगळवार १४ जानेवारी २०२५ - मकरसंक्रांती
बुधवार १५ जानेवारी २०२५ - संक्रांत करिदिन
गुरुवार १६ जानेवारी २०२५ - धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन, महादेव गोविंद रानडे पुण्यतिथी
शुक्रवार १७ जानेवारी २०२५ - संकष्ट चतुर्थी
मंगळवार २१ जानेवारी २०२५ - कालाष्टमी, स्वामी विवेकानंद जयंती (तिथिपूजा)
बुधवार २२ जानेवारी २०२५ - गुळवणी महाराज पुण्यतिथी
गुरुवार २३ जानेवारी २०२५ - नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती, बाळासाहेब ठाकरे जयंती
शनिवार २५ जानेवारी २०२५ - षट्तिला एकादशी, संत निवृत्तिनाथ यात्रा - त्र्यंबकेश्वर
रविवार २६ जानेवारी २०२५ - गणराज्य दिन
सोमवार २७ जानेवारी २०२५ - सोमप्रदोष, शिवरात्री
मंगळवार २८ जानेवारी २०२५ - लाला लजपतराय जयंती
बुधवार २९ जानेवारी २०२५ - दर्श अमावस्या, मौनी अमावस्या, कुंभमेळा (प्रयाग)
गुरुवार ३० जानेवारी २०२५ - माघ मासारंभ, महात्मा गांधी पुण्यतिथी
एकादशीचे व्रत भगवान विष्णूला समर्पित आहे. महाराष्ट्रात विठ्ठलाच्या दर्शनाने एकादशी व्रत पूर्ण होते. असे मानले जाते की, या व्रताच्या पुण्यप्रभावामुळे कुटुंबात सुख-शांती येते आणि आर्थिक प्रगती साधली जाते.
पौष पौर्णिमा - हिंदू धर्मात पौर्णिमेच्या व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी देवी लक्ष्मी, भगवान विष्णू आणि चंद्र देव यांची पूजा केली जाते. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे.
मकर संक्रांत - या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. या दिवशी शुभ कार्यांची सुरुवात होते. तसेच मकर संक्रांतीला एकमेकांना तीळगूळ वाटून. पतंग उडवून हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात.
प्रदोष व्रत - हिंदू धर्मात प्रदोष व्रत भगवान शंकराला समर्पित मानले जाते. असे मानले जाते की, प्रदोष व्रत केल्याने मुलांच्या जीवनात आनंद येतो.
पौष अमावस्या - पौष महिन्याच्या अमावस्येला दर्श अमावस्या आणि मौनी अमावस्या म्हणतात. असे मानले जाते की, या दिवशी उपवास आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा येते आणि सुख-शांती मिळते.
संबंधित बातम्या