भगवान श्रीकृष्ण जयंतीला अवघे काही दिवस उरले आहेत. यावर्षी सोमवार २६ ऑगस्ट रोजी, श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात येणार आहे. भगवान श्रीकृष्णाशी संबंधित अनेक कथा आणि रहस्ये प्रचलित आहेत.
असं म्हटलं जातं की ब्रजभूमीचा प्रत्येक काना-कोपरा भगवान श्रीकृष्णाच्या रासलीलेचा साक्षीदार आहे. येथे अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे श्रीकृष्णाच्या जन्मापासून ते त्यांच्या किशोरावस्थेपर्यंतच्या घटनांच्या खुणा आहेत. श्रीकृष्ण येथे गवळणींसोबत रासलीला करायचे. हातात बासुरी, डोक्यावर मोराच्या पिसांचा मुकुट आणि जवळ गायी आणि वासरे असायची. वृंदावन हे जगातील सर्वात सुंदर असल्याचे त्यांनी सांगितले होते, त्यामुळे वृंदावनाच्या प्रत्येक पावलावर राधा-कृष्णाची चाहूल लागते..
असेच एक जगंल म्हणजे निधीवन, जिथे आजही भगवान श्री कृष्ण रासलीला करायला येतात असे मानले जाते. हे ठिकाण मथुरेत आहे. आजही राधाकृष्ण रात्रीच्या वेळी रासलीला करण्यासाठी या जंगलात येतात, असा अनेकांचा समज आहे. या कारणास्तव, संध्याकाळी ७ किंवा ८ नंतर कोणत्याही प्राणी, पक्षी, भक्त किंवा पुजारीला या आवारात परवानगी नाही. निधिवनमधील कृष्ण लीलाशी संबंधित काही रंजक गोष्टी जाणून घेऊया-
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे संध्याकाळनंतर निधीवनमध्ये केवळ मानवच नव्हे तर पशु-पक्ष्यांचीही सावली दिसत नाही. लोकांचे म्हणणे आहे की, संध्याकाळनंतर जनावरे येथून पळू लागतात. आणखी एक खास गोष्ट म्हणजे निधीवनमध्ये सध्या एकही झाड सरळ दिसणार नाही. झाडांच्या फांद्या अडकलेल्या, गुंफलेल्या किंवा वाकलेल्या दिसतात. या ठिकाणी वाढलेल्या झाडांच्या फांद्या वरच्या दिशेने न जाता खालच्या दिशेने वाढतात. निधीवनमध्ये तुळशीची रोपे जोडून लावलेली आढळतात. लोकांचा असा विश्वास आहे की, जेव्हा भगवान श्री कृष्ण आणि राधा राणी रात्री रासलीला करतात तेव्हा तुळशीची रोपे गोपींमध्ये बदलतात.
संध्याकाळी आरती करण्यापूर्वी रंगमहालात चंदनाचा पलंग सजवला जातो. लोणी आणि खडीसाखर, मिठाईचा प्रसाद ठेवला जातो आणि पाण्याची भांडीही ठेवली जातात. लोक म्हणतात की रासलीला केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण येथे विश्रांतीसाठी येतात. सकाळी राजवाड्याचे दरवाजे उघडले की, पलंग वापरल्याचा भास होतो. प्रसाद आणि पाण्याचेही सेवन होताना दिसत आहे.
निधिवनच्या रहिवाशांचा असा विश्वास आहे की, जो कोणी रासलीला पाहण्याचा प्रयत्न करतो तो वेडा, आंधळा किंवा मुका होतो. या सर्व कथांमुळे निधिवनला भेट देण्यासाठी जगभरातून लोक येतात.
टीप : ही माहिती केवळ श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे.अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.