Janmashtami 2024 : जन्माष्टमीला तुमच्या राशीनुसार श्री कृष्णाला वस्त्र अर्पण करा, मनात येईल ती इच्छा पूर्ण होईल-janmashtami 2024 shree krishna should wear clothes of these colors according to the zodiac sign ,धर्म बातम्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  Janmashtami 2024 : जन्माष्टमीला तुमच्या राशीनुसार श्री कृष्णाला वस्त्र अर्पण करा, मनात येईल ती इच्छा पूर्ण होईल

Janmashtami 2024 : जन्माष्टमीला तुमच्या राशीनुसार श्री कृष्णाला वस्त्र अर्पण करा, मनात येईल ती इच्छा पूर्ण होईल

Aug 25, 2024 07:24 PM IST

जन्माष्टमीला गोकुळाष्टमी, कृष्णाष्टमी किंवा श्रीजयंती असेही म्हणतात. यावर्षी हा सण सोमवारी (२६ ऑगस्ट) साजरा केला जाणार आहे.

Krishna Janmashtami 2024: : जन्माष्टमीला तुमच्या राशीनुसार श्री कृष्णाला वस्त्र अर्पण करा, मनात येईल ती इच्छा पूर्ण होईल
Krishna Janmashtami 2024: : जन्माष्टमीला तुमच्या राशीनुसार श्री कृष्णाला वस्त्र अर्पण करा, मनात येईल ती इच्छा पूर्ण होईल (Pinterest)

श्रीकृष्ण जन्माष्टमीचा पवित्र सण दरवर्षी भगवान श्रीकृष्णाच्या भक्तांकडून मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. कान्हाच्या भक्तांसाठी हा दिवस खूप खास आहे, या सणाची लोक आतुरतेने वाट पाहत असतात. जन्माष्टमीला दहीहंडी उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे.

जन्माष्टमीला गोकुळाष्टमी, कृष्णाष्टमी किंवा श्रीजयंती असेही म्हणतात. यावर्षी हा सण सोमवारी (२६ ऑगस्ट) साजरा केला जाणार आहे.

जर तुम्हाला श्री कृष्णाचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर तुम्ही तुमच्या राशीनुसार देवाला वस्त्र अर्पण करावे. असे मानले जाते, की असे केल्याने तुम्हाला लड्डू गोपाल तसेच नऊ ग्रहांचा आशीर्वाद मिळेल.

तुमच्या राशीनुसार श्री कृष्णाला वस्त्र अर्पण करा

मेष : मेष राशीच्या लोकांनी जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला लाल रंगाचे वस्त्र अर्पण करावे.

वृषभ : वृषभ राशीच्या लोकांनी जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला शुभ्र पांढरे वस्त्र अर्पण करावे.

मिथुन: मिथुन राशीच्या लोकांनी जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला हिरव्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे.

कर्क : कर्क राशीच्या लोकांनी जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला पांढऱ्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे.

सिंह : सिंह राशीच्या लोकांनी जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला लाल रंगाचे कपडे अर्पण करावेत.

कन्या : कन्या राशीच्या लोकांनी जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला हिरव्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे.

तूळ : तूळ राशीच्या लोकांनी जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला गुलाबी रंगाचे वस्त्र अर्पण करावे.

वृश्चिक : वृश्चिक राशीच्या लोकांनी जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला लाल रंगाचे वस्त्र अर्पण करावे.

धनु: धनु राशीच्या लोकांनी जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला पिवळ्या रंगाचे कपडे अर्पण करावेत.

मकर : मकर राशीच्या लोकांनी जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला निळ्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे.

कुंभ : कुंभ राशीच्या लोकांनी जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला निळ्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे.

मीन : मीन राशीच्या लोकांनी जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला पिवळ्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे.

 

 

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)