Janmashtami 2024 : जन्माष्टमीच्या दिवशी ‘या’ कृष्ण मंदिरांना भेटी द्या, मंत्रमुग्ध व्हाल!
मराठी बातम्या  /  धर्म  /  Janmashtami 2024 : जन्माष्टमीच्या दिवशी ‘या’ कृष्ण मंदिरांना भेटी द्या, मंत्रमुग्ध व्हाल!

Janmashtami 2024 : जन्माष्टमीच्या दिवशी ‘या’ कृष्ण मंदिरांना भेटी द्या, मंत्रमुग्ध व्हाल!

Published Aug 21, 2024 04:30 PM IST

तुम्हीही जन्माष्टमीच्या दिवशी मंदिरात जाण्याचा विचार करत असाल तर मथुरेच्या प्रसिद्ध मंदिरांना नक्की भेट द्या. असे मानले जाते की मंदिरांना भेटी दिल्याने साधकाला कृष्ण भक्तीची जाणीव होते. चला तर मग या मंदिरांबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

prem mandir mathura
prem mandir mathura

श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला होता, अशी धार्मिक श्रद्धा आहे. त्यामुळे या दिवशी जन्माष्टमी साजरी केली जाते. या विशेष प्रसंगी, मथुरेसह देशभरातील भगवान कृष्णाची मंदिरे सुंदर सजवली जातात आणि मोठ्या संख्येने भाविक त्यांच्या देवतेच्या दर्शनासाठी येतात.

तुम्हीही जन्माष्टमीच्या दिवशी मंदिरात जाण्याचा विचार करत असाल तर मथुरेच्या प्रसिद्ध मंदिरांना नक्की भेट द्या. असे मानले जाते की मंदिरांना भेटी दिल्याने साधकाला कृष्ण भक्तीची जाणीव होते. चला तर मग या मंदिरांबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

श्री कृष्ण जन्मभूमी मंदिर

मथुरेतील सर्व मंदिरे जन्माष्टमीच्या सणासाठी सुंदर सजवली जातात, परंतु सर्व मंदिरांचे मुख्य आकर्षण म्हणजे भगवान कृष्ण जन्मभूमी मंदिर. जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला सुंदर वस्त्र परिधान करून सजवले जाते. तसेच लोणी आणि साखरेच्या मिठाईसह ५६ नैवेद्य अर्पण केले जातात.

बांके बिहारी मंदिर (Banke Bihari Temple)

बांके बिहारी मंदिर वृंदावन येथे आहे. या मंदिरात वर्षातून एकदाच मंगला आरती केली जाते. २७-२८ ऑगस्ट रोजी पहाटे २ वाजता ठाकूर बांके बिहारी यांची मंगला आरती होते. या आरतीत भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. दुसऱ्या दिवशी नंदोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जाईल.

प्रेम मंदिर (Prem Mandir)

याशिवाय जन्माष्टमीच्या मुहूर्तावर तुम्ही प्रेम मंदिराला भेट देऊ शकता. बांके बिहारी मंदिरापासून हे मंदिर १५-२० मिनिटांच्या अंतरावर आहे. मंदिरात भगवान श्रीकृष्णाची अतिशय सुंदर झलक पाहायला मिळते. मंदिराचे सौंदर्य भाविकांना मंत्रमुग्ध करते.

निधीवन (Nidhivan)

मथुरेच्या वृंदावनातील निधीवन हे अतिशय पवित्र धार्मिक स्थळ मानले जाते. निधिवनमध्ये सायंकाळनंतर भाविकांना प्रवेश बंदी आहे. रंगमहाल या नावाने ओळखले जाणारे एक छोटेसे मंदिर आहे. धार्मिक मान्यतेनुसार, भगवान श्रीकृष्ण निधीवनात रात्री रास रचना करतात. या कारणास्तव रात्री कोणालाही आत प्रवेश दिला जात नाही. जर तुम्ही जन्माष्टमीला मथुरेला जात असाल तर निधीवनला जायला विसरू नका.

Whats_app_banner