Janmashtami 2023 Wishes On Social Media : महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये आज मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा करण्यात येत आहे. कृष्ण मंदिरांमध्ये भाविक मोठ्या संख्येने गर्दी करत लाडक्या श्रीकृष्णाची पूजा करत आहे. तसेच अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा देत जन्माष्टमीचा आनंद द्विगुणीत केला आहे. त्यामुळं आजच्या दिवशी तुमच्या मित्रमैत्रिणींना, आप्तेष्टांना किंवा नातेवाईकांना सोशल मीडियावर शुभेच्छांचे कोणते संदेश द्याल, वाचा.
१. आमच्या हृदयात आहे तुझं स्थान, हे नंदलाला लवकर ये आणि दहीहंडी फोड, आला रे आला गोविंदा आला, गवळ्यांच्या पोरींनो जरा मटकी सांभाळा, जन्माष्टमीच्या सर्वांना आभाळभर हार्दिक शुभेच्छा!
२. दही-दूध-लोणी आहे ज्याचा छंद, तो आमचा लाडका श्रीकृष्ण, सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा!
३. कृष्ण ज्याचं नाव, गोकुळ ज्याचं गाव, अशा भगवान श्रीकृष्णाला प्रणाम, सर्वांना गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!
४. राधाची भक्ति, बासुरी ची गोडी, लोणी चा स्वाद आणि गोपींचा रास, सर्व मिळून साजरा करू गोकुळाष्टमीचा दिवस खास. गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.
५. जसा आनंद नंदच्या घरी आला, तसा तुमच्या आमच्याही येवो, प्रत्येक घरी कृष्ण जन्म होवो, जन्माष्टमीचा हार्दिक शुभेच्छा.
६. चंदनाचा सुवास आणि फुलांची बरसात, दह्याची हंडी आणि पावसाची बरसात, तेव्हाच येतो चोरी करायला माखनलाल, गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!
७. कृष्ण ज्याचं नाव गोकुळ त्याचं गाव, अशा कन्हैयाला आम्हा सगळ्यांचं नमन, गोकुळाष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
८. गोकुळमध्ये ज्याचा निवास ज्याने गोपिकांसह रचला इतिहास, देवकी-यशोदा ज्याची आई, असा आहे आमचा कृष्णा खास, जन्माष्टमीच्या शुभेच्छा!
९. विसरुनी सारे मतभेद, लोभ- अहंकार सोडा रे सर्वधर्मसमभाव जागवून, आपुलकीची दहीहंडी फोडा रे, दहीहंडीच्या सर्वांना शुभेच्छा!
संबंधित बातम्या