जलाराम बापा हे एक लोकप्रिय हिंदू संत आहेत. हे गुजरात, भारतातील हिंदू संत होते. त्यांचा जन्म ४ नोव्हेंबर १७९९ रोजी, वीरपूर-खेर्डी राज्यात प्रधान ठक्कर आणि राजबाई यांच्या पोटी झाला. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी येणारी जलाराम जयंती पाळण्यासाठी एक दिवस समर्पित आहे.
असे म्हणतात की, वयाच्या १८ व्या वर्षी जलाराम बापांनी फतेहपूरचे संत श्री भोजलराम यांना आपले गुरू म्हणून स्वीकारले. वयाच्या २० व्या वर्षी त्यांच्या साधेपणाची आणि देवावरील प्रेमाची कीर्ती सर्वत्र पसरली. त्याच्या हयातीत लोकांनी अनेक चमत्कार पाहिले. सेवा कार्याबाबत जलाराम बापा म्हणायचे की ही देवाची इच्छा आणि देवाचे काम आहे, जे देवाने त्यांच्यावर सोपवले आहे. १९३४ च्या भीषण दुष्काळात वीरबाई आणि बापा यांनी लोकांची अखंड सेवा केली. १९३७ मध्ये बापाने प्रार्थना करताना देह सोडला.
जलाराम बापाचे विचार आणि चमत्कार देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहेत. यावर्षी हा दिवस ८ नोव्हेंबर २०२४ रोजी येत आहे. जलाराम जयंतीनिमित्त तुमच्या प्रियजनांना शुभेच्छा देण्यासाठी हे खास शुभेच्छा संदेश आहेत. वाचा, स्टेटस ठेवा आणि पाठवा.
जलाराम बापा जयंतीच्या दिवशी
तुम्हाला तुमच्या कार्यात आणि जीवनात
यश मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
जलाराम बापा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
…
नवीन विचार, नवीन आशा आणि
नवीन संधींसह साजरी करूया जलाराम जयंती.
जलाराम बापा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
…
राम नाम मे लीन है
देखत मन में राम
ताके पद वंदन करू
जय जय जलाराम
जलाराम बापा जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा
..
कुटुंबाला खाऊ घातलं तर कर्तव्य झालं,
मित्र-मैत्रीणींना खाऊ घातलं तर नाव झालं,
एखाद्या गरीबाला खाऊ घातलं तर
पुण्याचं काम झालं,
पण संपूर्ण जगाला खाऊ घातलं तर ते जलाराम झालेत
जलाराम जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा
…
दु:खाला विसरून जा कायमचे,
आनंद आणि यश तुमच्या जीवनात फुलू दे रोजचे!
जलाराम बापा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
…
सुख, समृद्धी, शांती आणि
यशाच्या शुभेच्छांसह,
जलाराम बापा जयंतीच्या
हार्दिक शुभेच्छा
…
तुमचे जीवन खूप शिकण्याने आणि सर्जनशीलतेने भरले जावो,
तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना
जलाराम बापा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
…