जीवनात भरपूर पैसा मिळावा,अशी प्रत्येकाची इच्छा असते. प्रत्येकजण त्या दृष्टीने प्रयत्न करत असतो. पण सर्वांनाच ही गोष्ट साध्य होते असे नाही. जीवनातील धनप्राप्तीच्या योगांविषयी जाणून घेण्यासाठी काही जण ज्योतिषशास्त्र किंवा सामुद्रिक शास्त्राच्या जाणकारांचा सल्ला घेतात.
ज्योतिषशास्त्रात आर्थिक लाभ किंवा पैसा मिळवण्याचे काही उपाय सांगितले आहेत. जर एखाद्या व्यक्तीच्या तळहाताला खाज सुटत असेल तर ती बाब शुभ मानली जाते. कारण हे धनप्राप्तीचे संकेत असतात.
शकुन शास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीच्या उजव्या हाताला किंवा शरीराच्या उजव्या भागात खाज येत असेल तर ते अशुभ मानले जाते. तुम्हाला या भागात खाज सुटत असेल तर तुमचे नुकसान होऊ शकते. किंवा तुम्हाला अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत, तुम्हाला पैसे हुशारीने खर्च करणे आवश्यक आहे.
जर एखाद्या व्यक्तीच्या डाव्या हाताला वारंवार खाज येत असेल तर ते शुभ संकेत मानले जातात. याचा अर्थ तुम्हाला लवकरच पैसे मिळू शकतात. शकुन शास्त्रामध्ये असे मानले जाते, की जेव्हा जेव्हा तुमच्या डाव्या हाताला खाज येते तेव्हा त्याचा अर्थ तुम्हाला चांगले दिवस येणार आहेत.
सोबतच, हातांव्यतिरिक्त, शरीराचे असे काही भाग आहेत, ज्या भागांना खाज सुटण्याला एक विशेष अर्थ आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या पायाला खाज येत असेल तर समजावे की तुम्हाला प्रवासाचा योग आहे. त्याच वेळी, स्वप्नात एखाद्या व्यक्तीच्या छातीवर खाज येत असेल तर ते देखील शुभ मानले जाते. म्हणजे तुम्हाला पैसे मिळणार आहेत.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)