भारतीय संस्कृती लग्न ही एक अत्यंत महत्वाची बाब आहे. आपल्या संस्कृतीत लग्नाला विशेष महत्व आहे. प्रत्येक धर्मात विविध पद्धतीने लग्न जुळविले जातात. त्यानुसार हिंदू धर्मात लग्न जुळविण्यासाठी सर्वप्रथम वधू-वराची पत्रिका जुळवली जाते. प्रामुख्याने पत्रिकेतील ३६ गुणांचा विचार केला जातो. ३६ पैकी ३० गुण जुळले तर तो विवाह अत्यंत शुभ आणि लाभदायक समजला जातो. मात्र वैदिक शास्त्रानुसार ३६ गुण पाहण्याआधी वधू-वराच्या पत्रिकेतील दोन मोठे दोष दूर करणे महत्वाचे असते. या शास्त्रानुसार एकवेळ ३६ गुण न पाहता केलेलं लग्न सुरळीत चालू शकते. मात्र ते दोन दोष दूर न केल्यास संसार अर्ध्यात मोडू शकतो.
बदलत्या काळानुसार विवाहपद्धतीसुद्धा बदलत आहेत. सांगायचं झालं तर अलीकडे कुटुंबीयांनी जुळवून लग्न करण्यापेक्षा प्रेम विवाह करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. शैक्षणिक क्षेत्रात किंवा नोकरीच्या ठिकाणी एखादी व्यक्ती आपल्या भेटली. त्यांचा स्वभाव, वागणूक, राहणीमान पंसत पडले की आपण लग्नाचा विचार सुरु करतो. अशावेळी वधू-वरांची कुंडली किंवा पत्रिका या गोष्टी पाहण्याला महत्व देत नाहीत. स्वभावगुण जुळले कि हे विवाह पार पडतात.
प्रेमविवाह करणाऱ्या लोकांचे विवाह टिकत नाहीत असे नाही. अनेक जोडपी अगदी आनंदाने संसार करतात. मात्र अलीकडे प्रेमविवाह करुनसुद्धा घटस्फोट घेणाऱ्यांची संख्या वाढलीय. तर याबाबत ज्योतिष अभ्यासानुसार सांगण्यात येत आहे की, पत्रिकेतील ३६ गुण न पाहता विवाह केला तरी तो विवाह निभावून जातो. मात्र जर वधू किंवा वराच्या कुंडलीत मंगळदोष किंवा नाडीदोष असेल तर त्याकडे लक्ष केल्यास विवाह यशस्वी होत नाहीत. या दोषांच्या अशुभ प्रभावाने अनेक विवाह संपुष्ठात येतात.
ज्योतिष शास्त्रानुसार, अनेक लोकांच्या पत्रिकेत लग्नाच्यावेळी मंगळ दोष किंवा नाडीदोष असतो. अशावेळी काहीही उपाय न करता नातेसंबंध जोडल्यास त्याचा अशुभ परिणाम पाहायला मिळतो. या दोषामुळे पतिपत्नीचे नाते टिकणे कठीण असते. अशा परिस्थिती कोर्टकचेरीसारखे प्रसंग उद्भवू शकतात. शिवाय घटस्फोट होऊन नातेसंबंध संपुष्ठात येऊ शकतात. पुढे जाऊन लग्नम संसार मोडण्यापेक्षा आधीच या दोषांवर उपाय करणे कधीही सोयीचे ठरते.
ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्याही जोडप्याचे लग्न ठरवताना सर्वात आधी त्यांची जन्म कुंडली पाहावी. त्यांनंतर त्यांचे ३६ गुण जुळतात का याची खात्री करुन घ्यावी. प्रामुख्याने फारच कमी लोकांचे ३६ गुण जुळतात. मात्र ३६ पैकी ३० आणि त्यापेक्षा थोडे कमी गुण जुळले तरी संसार उत्तम चालतो. परंतु शास्त्रानुसार जर त्या जोडप्याचे १८ किंवा त्यापेक्षा कमी गुण जुळले तर भविष्यात त्यांचा संसार टिकणे कठीण असते. तसेच अनेकांच्या पत्रिकेत मंगळ दोष आणि नाडीदोष आढळतो. अशावेळी त्या दोषांना दूर करणे गरजेचे असते. त्याकडे दुर्लक्ष केल्यास त्या जोडप्याला वैवाहिक आयुष्यात वाईट परिणाम भोगावे लागू शकतात. ज्योतिषांच्या सल्ल्यानुसार योग्य वेळी योग्य उपाय केल्यास वैवाहिक आयुष्य समृद्ध होऊ शकते.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती धार्मिक मान्यतांवर आधारित आहे. ती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे, असा हिंदुस्तान टाइम्स मराठीचा दावा नाही. त्यामुळं अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला जरूर घ्या.)