Vastu Tips: रद्दीपासून बंद घड्याळापर्यंत, घरातील ‘या’ वस्तू आर्थिक संकटाला देतात आमंत्रण; पाहा यादी
Vastu Tips for Home: वास्तुदोषामुळे घरात अनेक संकट निर्माण होऊ शकतात.
Vastu Tips For Money and Finance: वास्तुदोषामुळे कुटुंबात सुख-शांती नांदू शकत नाही, कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. वास्तुदोषामुळे आपले उत्पन्न, संपत्ती इत्यादींवरही वाईट परिणाम होऊ शकतो. परंतु, तुम्हाला माहिती आहे का, घरात ठेवलेल्या काही वस्तू वास्तुदोषाला कारणीभूत ठरू शकतात. काही वस्तूंचा घरात सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडतो, यामुळे अशा वस्तू तुमच्या घरात असतील तर, त्या घराबाहेर फेकून देणे योग्य ठरेल.
ट्रेंडिंग न्यूज
घरात चावी नसलेल्या टाळे किंवा वापरण्यात नसलेल्या चाव्या ठेवू नयेत, यामुळेही अनेक अडचणी निर्माण होतात. तसेच जुने पेन, बंद पडलेली टीव्ही, बंद पडलेले घड्याळ किंवा इस्त्री घरात ठेवल्याने नकारात्मकता पसरते. याशिवाय, जुनी रद्दी, लाकूड इत्यादींमुळे तणाव आणि अडथळा निर्माण होतो. अशा वस्तू तुमच्या घरात असतील तर त्या त्वरीत घराबाहेर काढा. महत्त्वाचे म्हणजे, झोपताना कधीही पाण्याची बॉटल तुमच्या डोक्याजवळ ठेवू नये. यामुळे मानसिक समस्या उद्भवू शकतात.
काही लोकांना जुनी वर्तमानपत्रे गोळा करण्याची सवय असते. जुनी वर्तमानपत्रे किंवा डायरी घरात ठेवल्याने कामात अडथळे निर्माण होतात. काही लोक अनावश्यक वस्तू स्टोअर रुममध्ये ठेवतात, ज्याचा वापर केला जात नाही. अशा वस्तूंमुळे देवी लक्ष्मी नाराज होते आणि घरात आर्थिक अडचणी निर्माण होतात.
(डिस्क्लेमर : वरील लेखात दिलेली माहिती पारंपरिक मान्यता व ज्योतिषशास्त्राच्या आधारे देण्यात आलेली आहे. ती पूर्णपणे सत्य आणि योग्य असेलच असे आमचे म्हणणे नाही. त्यामुळे अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रांतील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
विभाग