मराठी बातम्या  /  धर्म  /  Dussehra 2022 : दसऱ्याच्या दिवशी घरच्या घरी करा हे उपाय, घरात नांदेल सुख, शत्रू होतील दूर

Dussehra 2022 : दसऱ्याच्या दिवशी घरच्या घरी करा हे उपाय, घरात नांदेल सुख, शत्रू होतील दूर

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Oct 05, 2022 11:00 AM IST

Important Things To Do On Dussehra : अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दहाव्या तिथीला दसरा हा सण साजरा केला जातो. या सणाला विजयादशमी असेही म्हणतात. नवरात्रीत दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आणि दसऱ्याच्या दिवशी विसर्जन केले जाते.

दसऱ्याच्या दिवशी करा हे सोपे उपाय
दसऱ्याच्या दिवशी करा हे सोपे उपाय (हिंदुस्तान टाइम्स)

अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दहाव्या तिथीला दसरा हा सण साजरा केला जातो. या सणाला विजयादशमी असेही म्हणतात. नवरात्रीत दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आणि दसऱ्याच्या दिवशी विसर्जन केले जाते. या दिवशी भगवान रामाने लंकापती रावणाचा वध केला आणि देवी दुर्गेने महिषासुराचा वध केला. वास्तूमध्ये सांगितलेले काही सोपे उपाय दसऱ्याच्या दिवशी अवश्य करावेत, चला जाणून घेऊया.

दसऱ्याला शस्त्रास्त्रांची पूजा केल्याने शत्रूपासून मुक्ती मिळते. दसऱ्याला सुंदरकांड पठण केलेच पाहिजे. दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी माता लक्ष्मीचे ध्यान करताना मंदिरात झाडू दान करा. या दिवशी पुस्तके, वाहने आदींची पूजा केली जाते. दसऱ्याच्या दिवशी नीलकंठ पक्षी पाहणे अत्यंत शुभ मानले जाते. दसऱ्याच्या दिवशी हनुमानजींची पूजा करणे सर्वात फायदेशीर मानले जाते. या दिवशी हनुमान चालिसाचे पठण करावे. वास्तुशास्त्रानुसार रावण दहनाची लाकडे घरी आणणे शुभ मानले जाते.असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. नवरात्रीच्या काळात जवापासून अंकुर फुटतात, त्याला जयंती म्हणतात. विसर्जन करण्यापूर्वी लाल कपड्यात थोडी जयंती बांधून तिजोरीत ठेवावी. दसऱ्याच्या दिवशी श्री लक्ष्मी सूक्ताचे पठण करावे. या दिवशी संपूर्ण कुटुंबासह घराच्या अंगणात हवन करणे शुभ मानले जाते. दसऱ्याच्या दिवशी मिठाने घर पुसावे. या दिवशी शमी वृक्षाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे.दसऱ्याला घरी रांगोळी काढा. असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. या दिवशी कुटुंबातील सदस्यांनी एकत्र खीर खावी, यामुळे कुटुंबात गोडवा राहते.

(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला जरूर घ्या.)

WhatsApp channel

विभाग