मराठी बातम्या  /  धर्म  /  varad lakshmi vrat : वरदलक्ष्मी व्रत काय असते? काय आहे त्याचं महत्त्व?

varad lakshmi vrat : वरदलक्ष्मी व्रत काय असते? काय आहे त्याचं महत्त्व?

HT Marathi Desk HT Marathi
Nov 13, 2023 01:31 PM IST

varalaxmi vrat 2023 : श्रावणातील शेवटचा शुक्रवार अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी वरदलक्ष्मीचं व्रत केलं जातं? काय आहे या व्रताचं महत्त्व?

Varalaxmi Vrat 2023
Varalaxmi Vrat 2023

varalaxmi vrat 2023 : श्रावण महिना आणि व्रतवैकल्य हा आपल्या देशात जणू समानार्थी शब्द आहे. या महिन्यातील प्रत्येक दिवसाचं काही ना काही महत्त्व असतं. सण-उत्सवांबरोबरच श्रावणात काही व्रत देखील असतात. आजचा दिवसही असाच महत्त्वाचा आहे. आज, २५ ऑगस्ट रोजी वरदलक्ष्मी व्रत आहे. काही जण यास वरलक्ष्मी व्रत असंही म्हणतात.

ट्रेंडिंग न्यूज

श्रावण महिन्याच्या अखेरच्या शुक्रवारी हे व्रत पाळलं जातं. आपल्याकडं शुक्रवारचा दिवस माता लक्ष्मीचा मानला जातो. त्यातही श्रावणातील शेवटचा शुक्रवार अधिक महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी लक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते. या दिवशी उपवास करणार्‍या भक्तांवर लक्ष्मीची कृपा होते असं म्हणतात. अशा भाविक-भक्तांना आर्थिक ओढग्रस्तीचा सामना करावा लागत नाही, अशी देखील श्रद्धा आहे.

Thumb Palmistry : तुमच्या हाताचा अंगठा उलगडतो तुमचं संपूर्ण व्यक्तिमत्त्व, कसं ते वाचा

वरदलक्ष्मी व्रताचं महत्त्व

वरदलक्ष्मी व्रत हे मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण करणारं आहे. महिलांसाठी या व्रताचा महत्त्व खूपच वेगळं आहे. पुराणातील दाखल्यानुसार, वरदलक्ष्मी माता ही भगवान विष्णूची पत्नी मानली जाते आणि ती महालक्ष्मीचा अवतार असल्याचं म्हटलं जातं. श्रावणातील शेवटच्या शुक्रवारी तिची पूजा केल्यानं घर धन-धान्यानं भरून जातं. विवाहित महिलांसाठी हे व्रत लाभदायी आहे. हे व्रत केल्यास घरात सुख नांदतेच, शिवाय कुटुंबात स्नेहभाव आणि ऐक्य वृद्धिंगत होतं. त्याचबरोबर मुलांनाही सुख प्राप्त होतं, असं म्हणतात.

शुभ मुहूर्त

महाराष्ट्राबरोबरच उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि ओडिशातही लोक या दिवशी उपवास करतात. या दिवशी वेगवेगळ्या राशींच्या पूजा केल्या जातात. यंदा सिंह राशीची पूजा पहाटे आहे. वृश्चिक राशीची पूजा दुपारी १२.१७ ते २.३६ पर्यंत होईल. कुंभ राशीची पुजेची वेळ संध्याकाळी ६.२२ ते रात्री ७.५० ही आहे. रात्री १०.५० ते १२.४५ पर्यंत वृषभ राशीची पूजा होईल.

Kitchen Vastu Tips : स्वयंपाकघरात या गोष्टींचं पालन करणं लाभदायक, सुख-समृद्धीसाठी घरात काय कराल?

अशी करा वरदलक्ष्मीची पूजा

महिलांनी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत. घरात व्यवस्थित स्वच्छता करावी. संपूर्ण घरात गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडावं. घराच्या बाहेर रांगोळी काढावी आणि मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला स्वस्तिक काढावं. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूच्या मूर्तींना पंचामृतानं स्नान घालावं. त्यानंतर मूर्ती नवीन वस्त्रे परिधान करून सजवाव्यात. दिवाळीला ज्याप्रमाणे लक्ष्मीपूजन केलं जातं, तसंच पूजन करावं. श्रीगणेशाचीही पूजा करावी. त्यानंतर नैवेद्य अर्पण करून आरती करावी.

WhatsApp channel

विभाग