मराठी बातम्या  /  धर्म  /  Shattila Ekadashi : तुमचं घर धनधान्याने भरून जाईल, राहणार नाही कोणतीही कमतरता

Shattila Ekadashi : तुमचं घर धनधान्याने भरून जाईल, राहणार नाही कोणतीही कमतरता

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Jan 11, 2023 07:57 PM IST

Importance Of Shattila Ekadashi : या महिन्यात कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला षट्तिला एकादशीचेही खूप महत्त्व आहे. या दिवशी व्रत केल्यास विष्णूजींसोबतच देवी लक्ष्मीची कृपाही प्राप्त होते.

भगवान श्री विष्णू
भगवान श्री विष्णू (हिंदुस्तान टाइम्स)

षटतिला एकादशी १८ जानेवारी २०२३

हिंदू मान्यतेनुसार पौष आणि माघ महिना स्नान, दान आणि शुभकर्म करण्यासाठी अत्यंत शुभ मानले जातात. या महिन्यात कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला षट्तिला एकादशीचेही खूप महत्त्व आहे. या दिवशी व्रत केल्यास विष्णूजींसोबतच देवी लक्ष्मीची कृपाही प्राप्त होते. चला जाणून घेऊया.

षट्तिला एकादशी तारीख आणि शुभ वेळ

मान्यतेनुसार, षट्तिला एकादशीच्या पूजेमध्ये भगवान विष्णूला तीळ अर्पण करण्याचा आणि फक्त तीळ दान करण्याचा नियम आहे. असे केल्याने भगवान विष्णू लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात असे म्हणतात. त्याचबरोबर सर्व दुःखांपासून मुक्ती मिळवून जीवनात आनंद भरून काढतात.

षट्तिला एकादशी २०२३ तारीख

षट्तिला एकादशी २०२३ : १८ जानेवारीला षट्तिला एकादशी, यावेळी हा एक दुर्मिळ योगायोग असेल.

हिंदू कॅलेंडरनुसार,षट्तिला एकादशी तिथी मंगळवार, १७ जानेवारी रोजी संध्याकाळी ६.०५ पासून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी १८ जानेवारी, बुधवारी संध्याकाळी ४.०३ वाजता समाप्त होईल. उदय तिथी वैध असल्याने १८ जानेवारीला एकादशीचे व्रत केले जाणार आहे.

काय आहे षटतिला एकादशीची कथा

एकदा नारद मुनी वैकुंठात पोहोचले. तेथे त्यांनी भगवान विष्णूंना षट्तिला एकादशी व्रताचे महत्त्व विचारले. नारदजींच्या विनंतीवरून भगवान विष्णूंनी सांगितले की, प्राचीन काळी ब्राह्मणाची पत्नी पृथ्वीवर राहत होती. तिच्या पतीचा मृत्यू झाला होता. ती माझी प्रिय भक्त होती आणि माझी भक्ती करत होती. एकदा त्या ब्राम्हणींनी महिनाभर उपवास करून माझी पूजा केली. व्रताच्या प्रभावाने तिचे शरीर शुद्ध झाले, पण ती कधीही ब्राह्मणांना व देवांना अन्नदान करत नसे, त्यामुळे मला वाटले की ही स्त्री वैकुंठात राहूनही अतृप्त राहील, म्हणून मी स्वतः तिच्याकडे भिक्षा मागण्यासाठी गेलो. भिक्षा मागितल्यावर तिने मातीचा एक गोळा उचलून माझ्या हातावर ठेवला. काही काळाने ती शरीर सोडून वैकुंठात आली. तिला एक झोपडी आणि आंब्याचे झाड दिसले. रिकामी झोपडी पाहून ती माझ्याकडे आली आणि म्हणाली, मी धर्मनिष्ठ आहे. मग मला रिकामी झोपडी का मिळाली? तेव्हा मी तिला सांगितले की, अन्नदान न केल्याने आणि मला मातीचा एक गोळा दिल्याने असे घडले. तेव्हा मी तिला सांगितले की, जेव्हा देवकन्या तुला भेटायला येतील, तेव्हा तू षट्तीला एकादशीच्या व्रताचा नियम सांगीतल्यावर तू तुझे दार उघड. विष्णू देवाने सांगितल्याप्रमाणे त्या ब्राम्हणीने तेच केले आणि षट्तीला एकादशीचे व्रत केले. उपवासाच्या प्रभावामुळे तिची झोपडी अन्न आणि पैशाने भरून गेली. म्हणून हे नारदा, या एकादशीचे व्रत करून तीळ व अन्नदान करणार्‍याला मुक्ती व वैभव प्राप्त होते.

(या लेखात दिलेली माहिती, पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही आणि त्यांचा अवलंब केल्यास अपेक्षित परिणाम मिळेल असाही आम्ही दावा करत नाही)

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग