Kalbhairav Jayanti : काशीच्या कोतवालाची आज जयंती, जाणून घ्या कालभैरव जयंतीविषयी खास गोष्टी
Importance Of Kalbhairav Jayanti : काल भैरव जयंती दर महिन्याच्या कृष्ण पक्षातल्या अष्टमी तिथीला साजरी केली जाते. शिवभक्तांसाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो.
काशीचा कोतवाल काल भैरव जयंती आज साजरी केली जात आहे. भगवान काल भैरवांना काशीचा कोतवाल असंही संबोधलं जातं. काल भैरव जयंती दर महिन्याच्या कृष्ण पक्षातल्या अष्टमी तिथीला साजरी केली जाते. शिवभक्तांसाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो.कालभैरव हा शंकराचा पाचवा अवतार आहे.
ट्रेंडिंग न्यूज
काल भैरवांना प्रसन्न करण्यासाठी करा या खास गोष्टी
१. घरात कालभैरव यंत्राची स्थापना करा. त्याची रोज पूजा करा.ओम काल भैरवाय नम: असा जप करा. यामुळे कालभैरव प्रसन्न होतात.
२. रात्री १२ वाजता भैरव मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि कालभैरवांना निळी फुलं अर्पण करा. असं केल्याने भगवान कालभेरव प्रसन्न होतात.
३. कालाष्टमीच्या दिवशी कालभैरवाला दही आणि गुळ अर्पण करा. असं केल्याने भक्तांना थेट भगवान शिवाच्या चरणी स्थान मिळते असं सांग्तलं जातं.
४. आर्थिक, शारीरिक समस्या त्रास देत असतील किंवा शनि आणि राहू सतावत असतील तर त्या व्यक्तीने कालभैरवाची पूजा करावी.
पूजेचे शुभ मुहूर्त
कालभैरव अष्टमी तिथी १६ नोव्हेंबर रोजी आहे. पहाटे ५ वाजून ४९ मिनिटं ते १७ नोव्हेंबर रोजी ७ वाजून ५७ मिनिटांपर्यंत असेल.