महाशिवरात्रीच्या रात्री जागरणाचं महत्त्व काय? वैज्ञानिक कारण जाणून घ्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  महाशिवरात्रीच्या रात्री जागरणाचं महत्त्व काय? वैज्ञानिक कारण जाणून घ्या

महाशिवरात्रीच्या रात्री जागरणाचं महत्त्व काय? वैज्ञानिक कारण जाणून घ्या

Published Mar 07, 2024 10:24 PM IST

Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीला दिवसासोबतच महाशिवरात्रीच्या रात्रीलाही विशेष महत्त्व आहे. महाशिवरात्रीच्या रात्री जागर करून विशेष पूजा करण्याचा सल्ला दिला जातो.

महाशिवरात्रीच्या रात्री जागरणाचं महत्त्व काय? वैज्ञानिक कारण जाणून घ्या
महाशिवरात्रीच्या रात्री जागरणाचं महत्त्व काय? वैज्ञानिक कारण जाणून घ्या

पंचांगानुसार, दरवर्षी माघ वद्य चतुर्दशी तिथीला महाशिवरात्रीचा सण साजरा केला जातो. यंदा महाशिवरात्री उद्या शुक्रवारी (८ मार्च) साजरी केली जाणार आहे. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा शुभ विवाह झाला होता, अशी धार्मिक मान्यता आहे. तेव्हापासून हा उत्सव महाशिवरात्री या नावाने प्रचलित झाला आणि शिवभक्तांसाठी मोठा उत्सव बनला.

लोकांनी महाशिवरात्री उत्सवाची जय्यत तयारी सुरू केली आहे. महादेवाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी हा सण श्रेष्ठ असल्याचे म्हटले जाते.

महाशिवरात्रीला दिवसासोबतच महाशिवरात्रीच्या रात्रीलाही विशेष महत्त्व आहे. महाशिवरात्रीच्या रात्री जागर करून विशेष पूजा करण्याचा सल्ला दिला जातो. महाशिवरात्रीच्या रात्री जागरणाचे केवळ धार्मिकच नाही, तर त्याचे वैज्ञानिक महत्त्वही आहे. महाशिवरात्रीची रात्र इतकी खास का मानली जाते ते येथे जाणून घेणार आहोत.

महाशिवरात्रीच्या रात्री जागरण का करावे?

वैज्ञानिक दृष्टीने पाहायचे झाले तर महाशिवरात्रीच्या रात्र अत्यंत विशेष असते. या रात्री ग्रहांचा उत्तरी गोलार्द्ध या प्रकारे उपस्थित असतात की मनुष्याच्या आतील ऊर्जा प्राकृतिक रुपात वरच्या दिशेने जाऊ लागते. म्हणजेच प्रकृती स्वत: मनुष्याला त्याच्या अध्यात्मिक शिखरापर्यंत जाण्यास मदत करते.

तसेच, धार्मिक दृष्टीने पाहायला गेले तर प्रकृती त्या रात्री मनुष्याला परमात्माशी जोडते. याचा पूर्ण फायदा लोकांना मिळायला हवा म्हणून महाशिवरात्रीच्या रात्री जागरण करुन आणि ध्यान मुद्रेमध्ये बसण्याचे सांगण्यात आले आहे.

महाशिवरात्रीच्या रात्री हे उपाय करा

महाशिवरात्रीच्या रात्री काही विशेष उपाय अतिशय प्रभावी मानले जातात. ज्योतिषी सांगतात की हे उपाय केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि इच्छित परिणाम प्राप्त होतात.

१) शिवलिंगाची प्रतिष्ठापना- महाशिवरात्रीच्या संध्याकाळी घरामध्ये लहान पारद शिवलिंगाची स्थापना करा. हे शिवलिंग तुमच्या अंगठ्याच्या पहिल्या गाठीपेक्षा मोठे नसावे. ते स्थापित केल्यानंतर, दर तासाला विधिवत पूजा करा. या उपायाने घरात सुख-समृद्धी आणि समृद्धी येईल.

२) लग्नाच्या वस्तूंचे दान - महाशिवरात्रीला संध्याकाळच्या पूजेनंतर एखाद्या गरजू विवाहित महिलेला लग्नाचे साहित्य दान करणे उत्तम मानले जाते. हा उपाय केल्याने सौभाग्य आणि दीर्घायुष्याचा आशीर्वाद प्राप्त होतो. हे दान गुप्त ठेवा आणि त्याबद्दल कोणालाही सांगू नका.

३) शिव मंदिरात ११ दिवे लावा - जर तुम्हाला नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित समस्या येत असतील तर महाशिवरात्रीच्या रात्री शिव मंदिरात ११ दिवे लावा. यानंतर तिथे उभे राहून मनात ‘ओम नमः शिवाय’ चा जप करा.

शिवपुराणानुसार, कुबेर देवाने आपल्या पूर्वजन्मात रात्री शिवलिंगाजवळ दिवा लावला होता. या कारणास्तव कुबेर त्यांच्या पुढील जन्मात देवांचा खजिनदार बनले.

४) रात्रीचा जागर - महाशिवरात्रीच्या रात्री जागरणाला विशेष महत्त्व दिले गेले आहे. महाशिवरात्रीला रात्री जागरण करताना शिव सहस्रनामाचा पाठ करा. किंवा शिवाच्या लग्नाची कथा आणि शिवपुराण वाचा. रात्री जागर करण्यापूर्वी संध्याकाळी स्नान करावे, स्वच्छ वस्त्र परिधान करावे आणि नंतर भजन व कीर्तन करावे.

 

 

 

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner