तुमची स्वाक्षरी सांगते तुमच्याबद्दल सगळं काही! 'सही' च्या स्टाईलने ओळखा कसा आहे व्यक्तीचा स्वभाव-identify the personality of the person by the style of signature jyotish shastra prediction ,धर्म बातम्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  तुमची स्वाक्षरी सांगते तुमच्याबद्दल सगळं काही! 'सही' च्या स्टाईलने ओळखा कसा आहे व्यक्तीचा स्वभाव

तुमची स्वाक्षरी सांगते तुमच्याबद्दल सगळं काही! 'सही' च्या स्टाईलने ओळखा कसा आहे व्यक्तीचा स्वभाव

Sep 09, 2024 04:09 PM IST

Know Personality by Signature : प्रत्येक व्यक्ती त्याच्या स्वत: च्या इच्छेने किंवा आपल्या एका शैलीने सही करतो. प्रत्येक स्वाक्षरी व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व प्रकट करते. तुमची स्वाक्षरी कशी आहे आणि त्यातून तुमचा स्वभाव काय दर्शवतो जाणून घ्या-

स्वाक्षरी सांगते तुमचे व्यक्तीमत्व
स्वाक्षरी सांगते तुमचे व्यक्तीमत्व

Personality by Signature : ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, स्वप्नशास्त्र, समुद्रशास्त्र, वास्तुशास्त्र, हस्तरेषाशास्त्र हे असे शास्त्र आहे जे एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, गुण, वैशिष्ट्य आणि बरेच काही सांगून जाते. शास्त्रानुसार सूक्ष्म कृतींच्या आधारे भविष्यासंबंधी काही गोष्टी आपण सहजपणे जाणून घेऊ शकतो. दैनंदिन जीवनात घडणाऱ्या अनेक पैलूंचा यामुळे आपण एक अंदाज बांधू शकतो. आपल्या कुंडलीतील ग्रहाच्या स्थितीनुसार आपण आपल्यासोबत काय घडू शकते याचाही एक अंदाज बांधू शकतो. 

प्रत्येकजण वेगळ्या पद्धतीने सही करतो. कुणी नाव लिहिलं तर काही लोक नाव लहान करून सही करतात. तुमच्या स्वाक्षरीत दिसणारी अक्षरे तुम्ही कशी करता, याचाही तुमच्या आयुष्यावर प्रचंड प्रभाव पडतो.

स्वाक्षरीशिवाय अनेक औपचारिकता पूर्ण होत नाहीत. मग ती नोकरी, व्यवसाय किंवा बँकेशी संबंधित कोणतेही काम असो. वास्तुशास्त्रानुसार, स्वाक्षरीद्वारे तुम्ही केवळ तुमची संमती नोंदवत नाही तर तुमचे व्यक्तिमत्व किंवा स्वभावही प्रकट होतो. आपण कशी स्वाक्षरी करतो यामुळे आपल्या जीवनावर काय परिणाम होतो जाणून घ्या.

तुमच्या स्वाक्षरीवरून तुमच्या स्वभावात कोणता गुण दडलाय जाणून घ्या

स्वाक्षरीचा जीवनावर खोल प्रभाव पडतो. जे आडनाव न लावता, स्वाक्षरीत फक्त त्यांचे नाव लिहितात, ते कोणाचेही ऐकत नाहीत. ते स्व इच्छेनुसार सर्वकाही करतात.

जे लोक घाईघाईने आणि अयोग्यपणे सही करतात त्यांना जीवनात अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. ते हुशार आणि चाणाक्षही असतात. अगदी एखाद्याला फसवू शकतो.

जे लोक कलात्मक आणि आकर्षक स्वाक्षरी करतात ते सर्जनशील स्वभावाचे असतात.

ज्या लोकांची सही त्यांच्या हस्ताक्षरासारखी वळणदार व सुंदर असते, ते प्रत्येक काम व्यवस्थित करतात.

तुमच्या स्वाक्षरीवरून तुमचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व जाणून घ्या -

ज्योतिषशास्त्रानुसार जे लोक सही करताना एकदाही पेन उचलत नाहीत, म्हणजेच ते एकाच वेळी सही करतात, अशा लोकांचे अनेक मित्र असतात.

असे म्हणतात की, ज्यांच्या स्वाक्षरीत सर्व अक्षरे स्पष्ट दिसतात, त्यांना सहज समजून घेऊ शकतो. हे लोक पारदर्शक असतात.

असे मानले जाते की, जे लोक त्यांच्या स्वाक्षरीतील अक्षरे विकृत करतात आणि त्यांना ओळखणे किंवा समजणे कठीण आहे. 

असे म्हणतात की, जे लोक त्यांच्या सहीमध्ये त्यांचे पूर्ण नाव लिहितात ते प्रतिभेने समृद्ध असतात.

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner
विभाग