Ravivarche Upay : सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय कराल
Ravivarche Upay : सूर्यदेवाला ग्रहांचा राजा म्हटलं आहे. हाच ग्रहांचा राजा अत्यंत तेजस्वी आहे. यात प्रचंड उर्जा भरलेली आहे. ज्याच्या राशीत सूर्य असतो ती व्यक्ती अत्यंत तेजस्वी आणि उर्जेने भरलेली असते.
सूर्यदेवाला ग्रहांचा राजा म्हटलं आहे. हाच ग्रहांचा राजा अत्यंत तेजस्वी आहे. यात प्रचंड उर्जा भरलेली आहे. ज्याच्या राशीत सूर्य असतो ती व्यक्ती अत्यंत तेजस्वी आणि उर्जेने भरलेली असते. रोज सकाळी उठल्यावर नित्यकर्म आटोपून अनेक लोकं सूर्याला नमस्कार करताना पाहायला मिळतात. आज रविवार आहे. आजचा दिवस सूर्यदेवाला समर्पित दिवस मानला गेला आहे. रवि अर्थात सूर्य आणि त्याचा वार म्हणजे रविवार. मग तेजाने भरलेल्या सूर्यदेवाची कृपा आपल्यावर व्हावी असं वाटत असेल तर आज काही उपाय आहेत जे तुम्ही करू शकता.
ट्रेंडिंग न्यूज
सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करावेत?
रविवारी सकाळी स्नान करून तांब्याच्या भांड्यातून सूर्यदेवाला जल अर्पण करावे. पाणी अशा प्रकारे अर्पण करावे की त्यातून प्रकाश निघून तो प्रकाश तुमच्यावर पडेल.
रविवारी सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे.
जर तुम्ही आर्थिक अडचणींमुळे त्रस्त असाल तर रविवारी सूर्य देवासोबत माता लक्ष्मीची पूजा करा, यामुळे तुमची आर्थिक प्रगती सुरू होईल असं सांगितलं जातं.
नोकरी-व्यवसायात प्रगती करण्यासाठी तांदूळ आणि गूळ पाण्यात मिसळून प्रवाहित करा, सूर्यदेव तुम्हाला या क्षेत्रांमध्ये पुढे जाण्यासाठी आशीर्वाद देईल.
सूर्यदेवाची कृपा मिळवण्यासाठी रविवारी उपवास करावा. उपवास करताना अन्न आणि मीठाचे सेवन करू नका.
ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांच्या कुंडलीत सूर्य बलवान असतो, त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळते आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक असते.
रविवारी गरजूंना दान केल्याने सूर्यदेवाची कृपा मिळू शकते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या
विभाग