आपलं घर हेच आपल्यासाठी सर्वस्व असतं. आपलं घर व्यवस्थित राहावं यासाठी आपण जीवाचं रान करतो. खूप कष्ट करून पैसा कमावतो. घर चांगलं ठेवायचं असेल किंवा घरातल्या सदस्यांना आनंदी आणि निरोगी राखण्यात पैसा काही प्रमाणात महत्वाची भूमिका अदा करतो. मात्र अनेकांच्या बाबतीत असं पाहायला मिळतं की त्यांना कितीही मेहनत केली तरीही त्यांच्या हाती पैसा काही टिकत नाही. आज गुरुवारचा दिवस आहे. ज्यांच्या हाती लक्ष्मी टिकत नाही त्यांनी आज काही उपाय केल्यास पैसा हाती टिकेल अशी शक्यता सांगितली जाते. काही अशा गोष्टी ज्या गुरुवारी अवश्य केल्यास तुम्हालाही हाती पैसा असल्याचं किंवा तो टिकल्याचं समाधान लाभेल.
गुरुवारी अवश्य करा हा उपाय
घरात तुमच्या किंवा तुमच्या परिवारातील सदस्याच्या हाती पैसा टिकत नसेल तर गुरुवारी घराच्या मुख्य दारावर गुलाल शिंपडावा आणि त्या गुलालावर शुद्ध तुपाचा दोन मुख असलेला (दोन बाजूने वाती काढून प्रज्वलीत केलेला) दिवा लावावा. दिवा लावताना भविष्यात घरात धनहानी पासून वाचव अशी प्रार्थना मनात करावी. दिवा विझल्यावर तो वाहत्या पाण्यात प्रवाही करावा.
सलग ११ गुरुवार खाली दिलेला उपाय करावा.
घराच्या किंवा व्यवसायाच्या ठिकाणी मुख्य दरवाजाचा एक कोपरा गंगेच्या पाण्याने धुवून घ्य़ा. यानंतर तिथे एक स्वस्तिक बनवा. त्या स्वस्तिकावर हरभरा, डाळ आणि थोडा गूळ ठेवावा. काही वेळानंतर त्या स्वस्तिकाकडे लक्ष द्या. जर स्वस्तिक खराब झालं असेल तर सर्व साहित्य एकत्र गोळा करुन ते प्रवाहित करा.
गुरुवारी श्रीगणेशासमोर मोदकांचा नैवेद्य ठेवून गणेशाचं स्मरण करावं आणि त्यांना आपली समस्या सांगावी. श्रीगणेश विघ्नहर्ता आहेत. गणपती बाप्पांच्यासमोर धूपदीप लावा आणि त्यांची आरती करा. पैशाशी संबंधित दोष दूर होईल.
शुक्लपक्षातल्या गुरुवारपासून हा उपाय सुरु करावा आणि पुढच्या गुरुवारपर्यंत हा उपाय रोज करावा.
पुष्य नक्षत्राच्या वेळेस गुरुवारी सूर्योदयाच्या एका तासात किंवा सूर्यास्ताच्यावेळेस कच्च्या सुताचे ११ वेटोळे करा. पाण्यात केशर विरघळवून घ्या. त्यात हे सूत भिजवा. मग हे केशरी सूत भगवंताच्या चरणी ठेवा आणि आपल्या मनातली इच्छा देवाला सांगा. गुरुवारी काम करताना हे सूत आपल्या शरीराजवळ ठेवा.(हातात,मनगटावर,गळ्यात) तुमची इच्छा पूर्ण होत असल्याचं तुमच्या लक्षात येईल.
(या लेखात दिलेली माहिती, पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही आणि त्यांचा अवलंब केल्यास अपेक्षित परिणाम मिळेल असाही आम्ही दावा करत नाही)